जिल्हा रुग्णालयात जागतिक ऑटीझम डे संपन्न
सिंधुदुर्गनगरी
सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालय येथील डिईआयसी विभागामार्फत जागतिक ऑटीझम डे संपन्न झाला. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, यांनी डिईआयसी कार्यक्रमांच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या सेवाबाबत तर श्रीम. मनिषा कर्चे यांनी ऑटीझम डे च्या अनुषंगाने विस्तृत माहिती दिली.
यावेळी अति.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्याम पाटील, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुबोध इंगळे, डिईआयसी स्टाफ विक्रम कांबळे, डॉ. अनुराधा बांदिवडेकर, श्रीम. ॲजेला रॉड्रीक्स, केतन कदम, श्रीम. लोचन चिंदरकर, श्रीम. मनिषा कर्चे, श्रीम. शलाका राणे, संतोष देसाई, रोहन वारंग, ओमकार ठाकूर, तसेच पालक व बालके उपस्थित होते.
कार्यक्रमांचे प्रास्ताविक केतन कदम यांनी केले. बालकांच्या हस्ते केक कापून ऑटीझम डे साजरा करण्यात आला. लहान मुलांसाठी चित्र रंगवणे तसेच इतर खेळ घेण्यात आले. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे