You are currently viewing मळगावमध्ये उद्यापासून रंगणार जय भंडारी चषक लीग- 2025 क्रिकेट स्पर्धा

मळगावमध्ये उद्यापासून रंगणार जय भंडारी चषक लीग- 2025 क्रिकेट स्पर्धा

मळगावमध्ये उद्यापासून रंगणार जय भंडारी चषक लीग- 2025 क्रिकेट स्पर्धा

सावंतवाडी

मळगावच्या म्हारकाटा मैदानावर ५ आणि ६ एप्रिल रोजी गाव मर्यादित भंडारी चषक लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत प्रथम पारितोषिक रुपये १५ हजार (शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब पुरस्कृत) व गणेश प्रसाद पेडणेकर पुरस्कृत आकर्षक चषक आणि द्वितीय पारितोषिक रुपये १० हजार (श्रीम. मनोरामा महादेव चौधरी चॅरिटेबल ट्रस्ट

व प्रगत सिंधुदुर्ग मुंबई

संस्था अध्यक्ष दयानंद चौधरी आणि युवा उद्योजक प्रसाद नाईक पुरस्कृत ) व श्री. महादेव हळदणकर यांच्या स्मरणार्थ श्री. पांडुरंग हळदणकर यांच्याकडून आकर्षक चषक देण्यात येणार आहेत.

तर मालिकावीर ( समीर परब यांच्याकडून मालिकावीरास आकर्षक ट्रॉफी ), सामनावीर: प्रत्येक सामन्यातील सामनावीरास ज्येष्ठ पत्रकार सचिन रेडकर व सामाजिक कार्यकर्ते शेखर गावकर पुरस्कृत आकर्षक चषक, उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाज ( कै. प्रविण लक्षण सातार्डेकर यांच्या स्मरणार्थ )श्री. प्रितम दिवाकर सातार्डेकर यांच्याकडून आकर्षक चषक तर

उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि उदयोन्मुख खेळाडूसाठी पप्पू कांबळी यांच्याकडून आकर्षक चषक देण्यात येणार आहे.

या स्पर्धेविषयीच्या अधिक माहितीसाठी गितेश अमरे – 7620735663 व महेंद्र पेडणेकर – 9022686944 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा