You are currently viewing वळवाची सर…

वळवाची सर…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*वळवाची सर…*

 

आली आली आली आली वळवाची सर

धुडूमधाड खुडूमखाड गर्जलेत वर

आली वळवाची सर..

 

काळेकुट्ट नभ वर बसलेत हत्ती

दंगामस्ती पहा तिथे करतात किती

ढकलाढकली कित्ती मारामारी वर

आली वळवाची सर…

 

आदळती इथे तिथे ठेचाळते अंग

मारामारी करण्यात सारे होती दंग

वारा पळवितो त्यांना सैरावैरा बरं

आली वळवाची सर…

 

पालापाचोळा पळतो आभाळात दाटी

पाचोळ्याच्या सवे पहा उडे किती माती

थंडगार वाऱ्यासंगे सरी सरसर..

आली वळवाची सर…

 

पाणी पाणी पाणी पाणी जिकडे तिकडे

चमकती झाडे पाने रस्ते चोहिकडे

आरशात प्रतिबिंबे दिसती सुंदर…

आली वळवाची सर…

 

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा