You are currently viewing खासदार नारायण राणे वाढदिवसाचे औचित्य साधून सावंतवाडीत खासदार चषक 2025

खासदार नारायण राणे वाढदिवसाचे औचित्य साधून सावंतवाडीत खासदार चषक 2025

खासदार नारायण राणे वाढदिवसाचे औचित्य साधून सावंतवाडीत खासदार चषक 2025

देव्या सूर्याजी यांची पत्रकार परिषदेत माहिती

सावंतवाडी –

माजी केंद्रीय मंत्री तथा रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून खासदार चषक २०२५ च आयोजन करण्यात आले आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब पुरस्कृत युवासेना तालुका सावंतवाडी तर्फे या चषकाच आयोजन करण्यात आल आहे. ‘एक गाव, एक संघ’ अशी अट असून विजेत्या संघाला रोख रुपये १ लाख व आकर्षक पारितोषिक, उप विजेत्या संघाला रोख ५० हजार व आकर्षक पारितोषिक दिले जाणार आहे. ही स्पर्धा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघापुरती मर्यादीत आहे अशी माहिती देव्या सुर्याजी यांनी दिली आहे.

माजी केंद्रीय मंत्री खास. नारायण राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब पुरस्कृत युवासेना तालुका सावंतवाडी तर्फे खासदार चषक २०२५ च आयोजन करण्यात आले आहे. ८ ते १० एप्रिल रोजी जिमखाना मैदान स्वार हॉस्पिटल समोर हे क्रिकेट सामने होणार आहेत अशी माहिती श्री. सुर्याजी यांनी दिली. तर प्रथम येणाऱ्या १६ संघांना स्पर्धेत प्रवेश दिला जाईणार असून संपूर्ण स्पर्धा साखळी (league) पध्दतीने खेळवली जाणार आहे. प्रत्येक दिवशी 8 संघ खेळतील. (4- 4 चे दोन ग्रूप), सर्व सामने ४ षटकांचे होणार आहेत. संघ निश्चित करण्याची अंतीम तारीख ६ एप्रिल २०२५ असून खेळाडूने आधारकार्ड घेऊन येणे बंधनकारक आहे. खेळाडूने ट्रॅक पँट व शूज घालून खेळणे बंधनकारक असून कोणत्याही खेळाडूस दुखापत झाल्यास मंडळ जबाबदार राहणार नाही. प्रत्येक दिवशी स्पर्धा सकाळी ठीक ९ वाजता सुरु करण्यात येतील. कोणत्याही क्षणी स्पर्धेत बदल करण्याचा अधिकार मंडळाकडे राहील व पंचाचा निर्णय अंतिम राहील. स्पर्धेत प्रवेश फी रु.10,000/- गुगल पे केल्यानंतर प्रवेश निच्छित मानला जाईल, जास्तीत जास्त संघानी यात सहभाग घ्यावा असे युवासेना तालुका प्रमुख प्रतिक बांदेकर यांनी सांगितले. अधिक माहितीसाठी संपर्क देव्या सूर्याजी – ८२७५६५२०७३
प्रतीक बांदेकर – ८९८३७६७३५३
आशुतोष चिटणीस – ९८२३१४४८७४ साधावा. यावेळी युवा सेना तालुकाप्रमुख प्रतीक बांदेकर,देव्या सुर्याजी,विधानसभा प्रमुख अर्चित पोकळे, उपसरपंच स्वप्निल परब, अनिकेत पाटणकर,साईश वाडकर,प्रथमेश प्रभू,चेतन गावडे,सुरज मठकर,शैलेश तळवडेकर,श्याम जाबरे आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा