You are currently viewing शासनाकडून शिरोडा वेळागर येथील संघर्ष समितीची फसवणूक : आजू आमरे

शासनाकडून शिरोडा वेळागर येथील संघर्ष समितीची फसवणूक : आजू आमरे

शासनाच्या विरोधात उद्या २६ जानेवारी रोजी करणार लाक्षणिक उपोषण

वेंगुर्ले
कोकणातील भूमिपुत्रांना विस्थापित करून त्यांच्या जमिनी प्रकल्पाच्या नावावर कोणी हडप करण्याचा प्रयत्न करत असेल तर ते खपून घेतले जाणार नाही, असे जाहीरपणे सांगणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आम्हा स्थानिकांना विश्वासात न घेता शिरोडा वेळागर येथील सर्वे नंबर ३९ सह अन्य सुमारे १०४ एकर जमीन धनदांडग्या ताज ग्रुपला नव्वद वर्षाच्या करारावर दिली. ही आमची फसवणूक आहे. गेल्या २८ वर्षात ज्यांनी पर्यटन वृद्धीसाठी येथे काही केले नाही त्यांना येथील एक इंच जमीनही घेऊ देणार नाही, असा इशारा पत्रकार परिषदेद्वारे शिरोडा वेळागर संघर्ष समितीने दिला. तसेच शासनाच्या धोरणाविरोधात २६ जानेवारी रोजी आम्ही सर्वे नंबर ३९ मधील सर्व नागरिक सामूहिकरीत्या व्यवसाय बंद ठेवून उपोषण करणार असल्याचे समितीचे अध्यक्ष आजू आमरे व मार्गदर्शक जयप्रकाश चमणकर यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा