You are currently viewing खा. नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त 8 एप्रिल रोजी वैभववाडी भाजपा तर्फे रस्सीखेच स्पर्धेचे आयोजन 

खा. नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त 8 एप्रिल रोजी वैभववाडी भाजपा तर्फे रस्सीखेच स्पर्धेचे आयोजन 

खा. नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त 8 एप्रिल रोजी वैभववाडी भाजपा तर्फे रस्सीखेच स्पर्धेचे आयोजन

वैभववाडी

माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त वैभववाडी भाजपाच्या वतीने मंगळवार दि. 8 एप्रिल रोजी सायंकाळी 4 वाजता भव्य जिल्हास्तरीय रस्सीखेच स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा येथील अर्जुन रावराणे विद्यालयाच्या पटांगणावर घेण्यात येणार आहे. स्पर्धेतील विजेत्या संघास 10 हजार रुपये, व चषक, द्वितीय क्रमांकास 7 हजार रुपये व चषक, शिस्तबद्ध संघास 2 हजार रुपये व चषक देण्यात येणार आहे. या स्पर्धेत भाजपच्या वतीने प्रत्येक खेळाडूला टी-शर्ट देण्यात येणार आहे. या स्पर्धेचे बक्षीस वितरण 10 एप्रिल रोजी ओरोस येथील शरद कृषी भवन याठिकाणी सायंकाळी 6 वाजता होणार आहे. या स्पर्धेत इच्छुक संघांनी आपली नावे 5 एप्रिल पर्यंत नोंदवावी. स्पर्धा विनामूल्य घेण्यात येणार आहे. तालुका व जिल्ह्यातील संघांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन वैभववाडी भाजपा अध्यक्ष सुधीर नकाशे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी रितेश सुतार 9604053476, अतुल सरवटे 8975922166, रणजीत तावडे 8805632829, रोहन रावराणे 9860084545, अतुल सरवटे रणजीत तावडे रोहन राव राणे यांच्याशी संपर्क साधावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा