You are currently viewing सर्विस लाईनला स्पार्किगमुळे आगीचा धोका – दिपाली भालेकर

सर्विस लाईनला स्पार्किगमुळे आगीचा धोका – दिपाली भालेकर

सर्विस लाईनला स्पार्किगमुळे आगीचा धोका – दिपाली भालेकर

महावितरण अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन केले सादर..

सावंतवाडी

सावंतवाडी गवळीतिठा येथे सर्विस लाईन मध्ये स्पार्किगमुळे वारंवार आग लागत असून महावितरणने तात्काळ या प्रकारची दखल घ्यावी अन्यथा काही दुर्घना घडल्यास सर्वस्वी महावितरण जबाबदार राहणार असे आज सावंतवाडी येथील नगरसेविका सौ.दिपाली भालेकर यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन सुनावले.

सौ. भालेकर म्हणाल्या की, आज सकाळी जय ओंकार मॅचिंग सेंटर, चंद्रकांत वॉशिंग कंपनी व चारभुजा बेकरी येथे स्पार्किंग होऊन आग लागली , दिवस असल्यामुळे नगरपालिकेचा बंब बोलवून आग विझवण्यात आली, पाऊस पडल्यामुळे आगीचा मोठा भडका उडाला नाही.
तसेच आठ दिवसांपूर्वी दोन वेळा या लाईनलाच पार्किंग होऊन आग लागली होती, त्यावेळीही आजूबाजूच्या लोकांनी ती विझवली.
आठ दिवसापूर्वी ही लेखी तक्रार केली होती त्यावेळी योग्य ती कारवाई न केल्यामुळे आज पुन्हा ही आग लागली आहे, भविष्यात हे स्पार्किंग होऊन आजूबाजूच्या एकमेकाला लागून असलेल्या इमारतींना भयंकर धोका उद्‌भवू शकतो , यापुढे दुर्घटना होऊ नये यासाठी योग्य ती तात्काळ कार्यवाही करावी जेणेकरून भविष्यात होणारा धोका टळेल.
यावेळी नगरसेविका सौ.दिपाली भालेकर, सुनिल साळगावकर, दिलीप भालेकर, प्रदीप भालेकर, अतुल कुडव, शिवराम गवळी आदी नागरिक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा