You are currently viewing मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारोह संपन्न

मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारोह संपन्न

मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारोह संपन्न

सावंतवाडी

सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मदर क्वीन्स् इंग्लिश स्कूल सावंतवाडी मध्ये दिनांक 29 मार्च व 2 एप्रिल 2025 रोजी वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन श्रीमंत राणीसाहेब सौ शुभदादेवी भोंसले, सहाय्यक संचालक अॅडव्होकेट शामराव सावंत, सदस्य श्री जयप्रकाश सावंत व डॉक्टर सतीश सावंत तसेच पालक शिक्षक संघाचे सदस्य उपस्थित होते. दीपप्रज्वलन व राजमातांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. मान्यवरांच्या स्वागतानंतर पारितोषिक वितरणास सुरुवात झाली. शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये आयोजित विविध सहशालेय स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिकच्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत श्रीम इंतिजिया फर्नांडिस यांनी केले तसेच इयत्ता पहिली ते चौथीच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीम हीना शेख व पाचवी ते दहावी च्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंतिजिया फर्नांडिस यांनी केले व आभार प्रदर्शन श्रीम अर्चिता सुभेदार यांनी मानले.
सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीमंत राजेसाहेब खेमसावंत भोंसले ,चेअरमन श्रीमंत राणीसाहेब सौ शुभदादेवी भोंसले ,विश्वस्त श्रीमंत लखमराजे भोंसले ,विश्वस्त युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले, संस्थेचे सदस्य तसेच प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीम. अनुजा साळगावकर, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी ,पालक शिक्षक संघ, माता पालक संघ कार्यकारी समितीच्या सदस्यांनी कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा