*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ स्मिता श्रीकांत रेखडे लिखित अप्रतिम काव्यरचना*
*श्रीराम निघाले वनवासाला*
दशरथ कौसल्येचा रघुकुल भूषण
आनंदात प्रजा वसे अयोध्या नगरी
राज्याभिषेकाचा क्षण समीप आला
हर्षाने उजळीत सजली अवधपुरी ||१||
दासी मंथरा कैकयीस स्मरण करीता
रामास घडावा चौदा वर्षे वनवास
वरदानाने भरतास मिळावे राज्य
शोक अनावर जाहला दशरथास ||२||
आज्ञा घेऊनी श्रीराम निघाले वनवासाला
राजवस्त्र त्यागुनी तमसा नदी किनारी
सीता,लक्ष्मणा सह कुटी दंडकारण्यी
निरोप देई शोकाकुल अयोध्या नगरी ||३||
श्रीरामास विनवी व्याकुळ बंधु भरत
नको मज राजगादी धरोनी राम चरण
पादुका ठेवुन पाहे बंधु राज्यकारभार
उर्मिला होई कष्टी आला वियोगाचा क्षण ||४||
आज्ञाधारक राम सीता होई वनवासी
रक्षण करण्या सावली बंधु लक्ष्मणाची
वियोगाने उर्मिलेचे नेत्री अश्रु ओघळले
देता निरोप व्याकुळ जनता अयोध्येची ||५||
रामाच्या पदस्पर्शाने होई अहिल्या उध्दार
यज्ञात विघ्न आणता केले असुर निवारण
अभिलाषा धरी मनी केले विद्रूप शुर्पणखा
कांचन मृगाची भुरळ पडता घडले रामायण ||६||
सौ. स्मिता श्रीकांत रेखडे.नागपूर