मालवण : तालुक्यातील वराड येथील सामाजिक कार्यकर्ते विष्णू लाड व बॅ नाथ पै सेवांगण कट्टाच्या कार्यवाह, खरारे पेंडूर गावच्या ग्रा.पं. सदस्या वैष्णवी लाड यांची कन्या कु. जान्हवी विष्णू लाड हिने एम. बी. बी. एस परीक्षेत उत्तम यश संपादन केले आहे. तिच्या यशामुळे गावच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. कु. जान्हवी ही अभ्यासात अत्यंत हुशार मुलगी असून इयत्ता ४ थी स्कॉलरशीप व ७ वी स्कॉलरशीप परीक्षेत ती गुणवत्ता यादीत आली होती. तर ओरोस येथील डॉन बॉस्को इंग्लिश मिडीयम स्कूल येथे शिक्षण घेताना दहावी एस.एस.सी परीक्षेत तिने १०० टक्के गुण मिळवत जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान मिळवला होता. तसेच नीट या परीक्षेतही तिचा यशाचा आलेख चढताच राहिला. ६६७ गुण मिळवत तिला केइम मेडिकल कॉलेज मुंबईला प्रवेश मिळाला. मेडिकलच्या प्रत्येक वर्षी ती विशेष गुणवत्तेसह उत्तीर्ण होत होती. अन अखेर ७४ टक्के गुण मिळवून विशेष गुणवत्तेसह ती डॉक्टर झाली. तिच्या यशात वडील विष्णू, आई वैष्णवी, भाऊ सोहम यांचा निश्चितच वाटा आहे. तिच्या या यशाबाबत तिचे समाजातील सर्व स्तरातून कौतुक होत आहे. बॅ. नाथ पै सेवांगण, संजय नाईक स्मृती प्रतिष्ठान यांच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला.

खरारे पेंडूर गावच्या जान्हवी लाडचे एम.बी.बी.एस परीक्षेत उत्तम यश
- Post published:एप्रिल 2, 2025
- Post category:बातम्या / मालवण / विशेष / सिंधुदुर्ग
- Post comments:0 Comments