मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :
महाराष्ट्रातील तरुणांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात, महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करता यावा आणि विविध उद्योगांना अधिक चालना मिळावी, या उद्देशाने शिव उद्योग संघटना मोठ्या प्रमाणावर रोजगार व व्यवसाय संधी उपलब्ध करून देण्याचा संकल्प करत आहे. गेल्या वर्षभरात रोजगार निर्मिती व व्यावसायिक उपक्रम राबवण्यात संघटना यशस्वी ठरली असून, या नवीन आर्थिक वर्षात महाराष्ट्रभर व्यापक प्रमाणात उद्योग विस्तार करण्याचा दृढ निर्धार करण्यात आला आहे. संघटनेच्या विविध समित्यांच्या माध्यमातून किमान १०,००० रोजगार निर्माण करण्याचे ध्येय निश्चित करण्यात आले आहे.
संघटनेचे पदाधिकारी आणि नवीन सहभागी होणाऱ्या सदस्यांच्या सहकार्याने हे उद्दिष्ट गाठण्याचा विश्वास संघटनेच्या नेतृत्वाने व्यक्त केला आहे. महाराष्ट्रातील युवक-युवतींना स्थिर व सुनियोजित व्यावसायिक संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी विविध क्षेत्रांमध्ये रोजगार निर्मिती केली जाणार आहे.
*शिव उद्योग संघटनेच्या रोजगार निर्मिती समित्या व उपक्रम:*
नवीन आर्थिक वर्षात रोजगार निर्मिती अधिक प्रभावी करण्यासाठी ११ स्वतंत्र समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.
१) भोजन समिती – खाद्य उद्योगातील सुवर्णसंधी, महाराष्ट्रभर सेंट्रल किचन प्रणाली सुरू करून मोठ्या प्रमाणावर खाद्य व्यवसाय वाढविण्याचा संकल्प करण्यात आला आहे. यात – खाणावळ आणि टिफिन सेवा, शाळा, महाविद्यालये, कार्यालये आणि हॉस्पिटल्ससाठी कॅन्टीन चालवणे, लघु खाद्य व्यवसाय (चहा-नाश्ता केंद्र, फूड वॅन), मोठ्या ऑर्डर्ससाठी सेवा देणे
२) आरोग्य व्यवसाय समिती – आरोग्य क्षेत्रातील नोकऱ्या आणि प्रशिक्षण, नर्सिंग असिस्टंट प्रशिक्षण सुरू करून त्यांना हॉस्पिटल्समध्ये नोकऱ्या उपलब्ध करून देणे. पेशंट केअर सेवा, नर्सिंग ब्युरो स्थापन करणे. आयुर्वेदिक डॉक्टर व थेरपिस्ट तयार करून पंचकर्म केंद्रे सुरू करणे. नर्सिंग कॉलेजेससोबत सहकार्य करून तरुणांना आंतरराष्ट्रीय नोकऱ्यांसाठी सक्षम बनवणे.
३) मार्केटिंग आणि मिडिया समिती – व्यावसायिकांसाठी नवे दार उघडणार, उद्योजक, उत्पादक, कलाकार आणि पत्रकार यांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी मदत. स्टार्टअप्स आणि नवीन उद्योगांना ब्रँडिंग व जाहिरात क्षेत्रात सहकार्य. डिजीटल मार्केटिंग आणि मिडिया व्यवसायासाठी प्रशिक्षण.
४) शिक्षण समिती – सरकारी नोकऱ्यांसाठी मार्गदर्शन व प्रशिक्षण, स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करून तरुणांना सरकारी नोकऱ्यांसाठी प्रशिक्षित करणे. मराठी शिक्षकांसाठी होम ट्युशन व शैक्षणिक क्लासेस सुरू करणे. विविध भाषांसाठी ट्रेनिंग क्लासेस उघडणे.
५) महिला रोजगार समिती – महिलांसाठी नवीन संधी, महिला उद्योजकांसाठी विविध उद्योग सुरू करणे. पाळणाघर आणि ज्येष्ठ नागरिक देखभाल केंद्र सुरू करणे. महिलांसाठी विशेष स्वरोजगार योजना राबविणे.
६) रोजगार समिती – तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या वाटा, स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर रोजगार संधी उपलब्ध करणे. विविध कंपन्यांशी करार करून रोजगार मेळावे आयोजित करणे.
७) इव्हेंट आणि एक्झिबिशन समिती – नवोदित व्यावसायिकांसाठी व्यासपीठ, विविध उद्योग आणि उत्पादक यांच्यासाठी प्रदर्शन व इव्हेंट्स आयोजित करणे. छोटे व मध्यम उद्योजकांना बाजारपेठ मिळवून देणे.
८) विवाह समिती – विवाह व्यवस्थापन व्यवसायाची नवी संधी, अभिनव विवाह मेळावे आयोजित करणे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर नोंदणी सेवा सुरू करणे. संपूर्ण विवाह व्यवस्थापनासाठी कॉन्ट्रॅक्ट घेणे.
९) पर्यटन समिती – महाराष्ट्राच्या संस्कृतीचा प्रचार व रोजगार निर्मिती, महिलांना प्रोत्साहन देऊन धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळांवर पारंपरिक वेशभूषेचा व्यवसाय सुरू करणे. महाराष्ट्रातील पर्यटन क्षेत्राचा विकास करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवणे.
१०) ई-कॉमर्स समिती – बचत गटांना मोठ्या बाजारपेठेची संधी, महिला बचत गट, लघु उत्पादक यांच्यासाठी ऑनलाइन विक्री प्लॅटफॉर्म सुरू करणे. १ मे २०२५ पासून ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म सुरू करून मोठ्या प्रमाणात व्यवसाय वाढवणे.
११) प्रॉपर्टी समिती – मालमत्ता व्यवस्थापन क्षेत्रात रोजगार, फ्लॅट, दुकान, इतर प्रॉपर्टी खरेदी-विक्री आणि भाडे व्यवहारांसाठी तरुणांना प्रशिक्षित करणे. महिलांना या क्षेत्रात संधी उपलब्ध करून देणे.
*१०,००० रोजगार निर्मितीचा संकल्प :*
शिव उद्योग संघटनेने या आर्थिक वर्षात किमान १०,००० रोजगार निर्मिती करण्याचे नियोजन केले आहे. महाराष्ट्रातील तरुण, महिला, उद्योजक आणि व्यावसायिकांना या संधीचा लाभ घेता यावा यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत.
*संघटनेच्या कार्यात सहभागी होण्याची संधी!*
शिव उद्योग संघटना आपल्या या भव्य रोजगार आणि व्यवसाय संधी कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करत आहे. इच्छुकांनी संघटनेच्या पदाधिकारी म्हणून कार्य करण्यासाठी खालील क्रमांकांवर 9702058930, 9820317150 संपर्क साधावा.
शिव उद्योग संघटनेच्या या उपक्रमामुळे महाराष्ट्रातील हजारो युवक, महिला आणि व्यावसायिकांना रोजगार व आर्थिक सक्षमीकरणाच्या संधी उपलब्ध होणार आहेत. संघटनेच्या प्रयत्नांना सर्वसामान्यांचा पाठिंबा मिळाल्यास हा महासंकल्प अधिक व्यापक स्वरूपात पूर्ण होईल, असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.