You are currently viewing सीता स्वयंवर रोमांचित क्षण

सीता स्वयंवर रोमांचित क्षण

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ. स्मिता श्रीकांत रेखडे लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*सीता स्वयंवर रोमांचित क्षण*

 

दशरथाचा पुत्र पराक्रमी राम

जनकाची भूमीकन्या सीता

अजरामर रामचरित मानस

दरबारी सजे स्वयंवर संहीता ||१||

 

मार्गशीर्ष पंचमीचा सुदिन

स्वयंवर रचिले जानकीचे

मंडपात ठेविले शिवधनुष्य

आगमन वीरश्री रघुपतीचे ||२||

 

विश्वामित्र,राम,लक्ष्मण आगमन

मधोमध रुपगर्विता लावण्यवती

राजीव लोचन दिपवी सभामंडप

अभिलाषा वरण्याची राजे धरती ||३||

 

शिवधनुष्यास जोडी प्रत्यंचा

देशोदेशीचे राजपुत्र हारले ‘पण’

श्रीरामाने तोडिले धनुष्यबाण

आनंदली सीता रोमांचित क्षण ||४||

 

रघुनंदनाशी मनमदिंरी नाते लाजे

मनोमनी मोरपिस फुले विश्वासाचे

देवता गंधर्वाचे सुर लाभे मिलनाला

तृप्ततेने मोहरती मातापिता दुहितेचे ||५||

 

लाज-या पापण्यात वसले राघव

आशीर्वचने देती सजता वरमाला

जयजयकार गुंजे मिथिला नगरी

रघुकुल भूषण निघती अयोध्येला ||७||

 

सौ. स्मिता श्रीकांत रेखडे

***********************

प्रतिक्रिया व्यक्त करा