You are currently viewing एप्रिल फुल

एप्रिल फुल

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी चंद्रशेखर कासार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*एप्रिल फुल*

 

न दिसणाऱ्या झाडावरचे

कधीच न दिसणारे

वर्षातून एकदाच उगवणारे

ते फुल कोणते आहे?

 

शहाण्याला मुर्ख बनवणारे

चपळ घोड्यालाही गाढव करणारे

चेष्टामस्करीच्या कामी येणारे

ते फुल कोणते आहे?

 

वर्षभरात आठवत नाही

कोणी ढुंकूनही बघत नाही

दिसायला कसे तेही माहीत नाही

त्याचा दिवस येताच आठवणारे

ते फुल कोणते आहे?

 

हसु फुलवणारे

हास्यफवारे उडवणारे

चेष्टेची पोळी शेकून घेणारे

एका दिवसाचे महत्व पटवणारे

ते फुल कोणते आहे?

 

कवी:-

*चंद्रशेखर प्रभाकर कासार*

*चांदवडकर ,धुळे.*

७५८८३१८५४३.

८२०८६६७४७७.

प्रतिक्रिया व्यक्त करा