स्वराज्य सरपंच सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रविण गवस यांच्या उपोषणाला यश
अखेर उद्या पासून तिलारी घाटातून लाल परी धावणार
दोडामार्ग
तिलारी घाटातून एसटी बसेस गेल्या पावसाळ्या पासून बंद होत्या,दोडामार्ग तालुक्यातून कर्नाटक व कोल्हापुरात जाण्यासाठी तिलारी घाट हा लगत चा मार्ग आहे आणि येथूनच एसटी फेऱ्या बंद झाल्या मुळे प्रवाशांचे हाल होत होते. तिलारी घाटातून एसटी बसेस सुरू करा यासाठी स्वराज्य सरपंच सेवा संघटनेचे जिल्हा अध्यक्ष प्रविण गवस यांनी अनेक वेळा स्थानिक ग्रामस्थांना सोबत घेऊन घाटात तसेच कोल्हापूर जिल्ह्यात जात आंदोलने, उपोषणे देखील केली होती.याची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभाग चंदगड यांनी घाट दुरुस्तीचे काम हाती घेतले व ते पूर्ण केले व त्यानंतर अवघड घाट वळणावर आरसे बसवण्यात यावे अशा सूचना वाहतूक नियंत्रकां कडून देण्यात आल्या त्याही अंमलात आल्यानंतर अखेर उद्या दिनांक २ एप्रिल पासून लाल परी तिलारी घाटातून धावणार आहे.
*लाल परिचे कोदाळी येथे होणार भव्य स्वागत ; प्रविण गवस*
तिलारी घाटातून एसटी फेऱ्या सुरू व्हाव्यात यासाठी अनेक वेळा सरपंच सेवा संघटनेचे जिल्हा अध्यक्ष प्रविण गवस यांनी आक्रमक भूमिका घेतली होती आणि आता खऱ्या अर्थाने या आक्रमक भूमिकेला यश आले आहे.तसेच चंदगड विभागाचे आमदार शिवाजी पाटील यांनी देखील यासाठी विशेष सहकार्य केले होते त्यांचे देखील प्रविण गवस यांनी आभार मानले तर उद्या पासून सुरू होणाऱ्या एसटी बसचे कोदाळी येथे श्रीफळ वाढवून भव्य स्वागत करणार असल्याचे प्रविण गवस यांनी बोलताना सांगितले आहे.