You are currently viewing मालवण-खोटले येथे जुगार अड्डयावर छापा, १३ जण ताब्यात…

मालवण-खोटले येथे जुगार अड्डयावर छापा, १३ जण ताब्यात…

मालवण-खोटले येथे जुगार अड्डयावर छापा, १३ जण ताब्यात…

स्थानिक गुन्हा अन्वेषणची कारवाई; पाच गाड्यांसह ३८ लाखाचा मुद्देमाल जप्त…

मालवण

तालुक्यातील खोटले-धनगरवाडी येथे डोंगराळ परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्डयावर छापा टाकून तेरा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई काल मध्यरात्री स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकाकडून करण्यात आली. संशयितांकडून ३८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यात १ लाख ४३ हजार रोख रक्कमेसह चार चाकी गाड्या आणि एक मोटरसायकलचा समावेश आहे.

या छाप्यात १३ आरोपींना घटनास्थळी पकडण्यात आले असून दोघे पसार झाले आहेत. कणकवली तालुक्यातील ६ मालवण तालुक्यातील ४ कुडाळ तालुक्यातील २ आणि सावंतवाडी तालुक्यातील असे एकूण १५ आरोपी आहेत. घटनास्थळी पंचनामा करून मालवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व आरोपींना मालवण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक अग्रवाल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक रावले यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी चे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, पीएसआय समीर भोसले, पीएसआय रामचंद्र शेळके, एएसआय राजू जामसंडेकर, सुधीर सावंत, हवालदार प्रमोद काळसेकर, किरण देसाई, आशिष गंगावणे, अनुप खंडे, प्रकाश कदम, आशिष जामदार आदींसह एलसीबी च्या पथकाने ही कारवाई केली.१३

प्रतिक्रिया व्यक्त करा