*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी गीतकार गायक संगीतकार अरूण गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*
*”श्री रामहृदय”*
सर्व होईल मंगल सांगे श्रीराम वचन
पवित्र असे करावे राम हृदय पठण IIधृII
उत्पत्ती स्थिती लय जाणणारा राम सर्वज्ञ
निष्काम विरक्त असणारा पण मायावान
आनंद रूपे प्रगटणारा आत्मज्ञानी जाणं
सितापती मनोहर रामास करू वंदन।।1।।
तारील भवसागर करू रामभक्ती निष्ठेनं
परम पदास नेई करिता राम भजन
अंतर्ज्ञानी राम करी जनोंद्धार गुरु आज्ञेनं
शिव पार्वती ला सांगती करावे राम स्मरण।।2।।
श्रीरामाला दिवस रात्र सारखे समान
धनुर्धारी प्रकाश रुपी सदा देदीप्यमान
श्रीराम संकटहारी शुद्ध ज्ञानानं संपन्न
निर्विकार सर्वव्यापी स्वयंप्रकाशी एक बाण।।3।।
त्यागी उपाधी युक्त चैतन्य आनंद घन
पापी अपराध्यांना करी क्षमा घेई सांभाळून
शिव सीता करिती स्तुती रामहृदय वर्णन
राम हृदयी धरून गाऊ राम गुणगान।।4।।
श्री अरुण गांगल.कर्जत रायगड महाराष्ट्र.
पिन.410201.Cell.9373811677.