सिंधुदुर्गात ईद सण उत्साहात साजरा….
सावंतवाडी
सिंधुदुर्गात आज मुस्लिम बांधवांच्या वतीने ईदचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मुस्लीम बांधवांनी मस्जिद मध्ये एकत्र येत नमाज पठण केले. तसेच एकमेकांना गळाभेट करत ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या. मुस्लिम धर्माचा महत्त्वपूर्ण सण म्हणजे ईद ही आनंद साजरा करण्याची ईद मानली जाते. आपापसांत बंधुत्वाचे संबंध प्रस्थापित करून प्रेम व आनंदाने साजरा केला जाणारा सण अशी त्याची ओळख आहे. रमजान महिन्यातील रोजे संपल्यानंतर ईद येते असल्याने रमजान ईद हा आजच्या या आनंदाचा सणादिवशी मुस्लिम बांधवांच्या चेहऱ्यावर आनंद खुललेला दिसत होता. ईदला नवीन वस्त्र परिधान करून मुस्लिम बांधव आज मशिदीत नमाज अदा करायला आले होते. अल्लाच्या प्रती नमाज अदा केल्यानंतर मुस्लिम बांधव एकमेकांना आलिंगन घेऊन ईदच्या शुभेच्छा देत होते.