You are currently viewing न्हावेलीत ‘छावा’ चित्रपटाचा विशेष मोफत शो

न्हावेलीत ‘छावा’ चित्रपटाचा विशेष मोफत शो

न्हावेलीत ‘छावा’ चित्रपटाचा विशेष मोफत शो

सावंतवाडी

छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित आणि त्यांची शौर्यगाथा सांगणारा ‘छावा’ चित्रपट सध्या चांगलाच गाजत आहे. अभिनेता विकी कौशल आणि तेलगू अभिनेत्री रश्मिका मंदाना यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्येही प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळवत आहे.

छत्रपती संभाजी महाराजांचा प्रेरणादायी इतिहास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा, या उदात्त हेतूने न्हावेलीचे उपसरपंच अक्षय पार्सेकर यांच्यासह नितेशा नाईक, नाना नाईक, रेश्मा नेमण, रोहित निर्गुण आणि सिद्धेश पार्सेकर यांनी पुढाकार घेतला आहे. यांच्या सहकार्याने तुळशीदास चंद्रशेखर पार्सेकर यांच्या घरी शुक्रवार, दिनांक ४ एप्रिल रोजी रात्री ठीक ८.०० वाजता ‘छावा’ चित्रपटाचा विशेष मोफत शो आयोजित करण्यात आला आहे.
न्हावेलीचे उपसरपंच अक्षय पार्सेकर आणि सर्व ग्रामस्थांनी ग्रामस्थांसह सर्व शिवप्रेमींना या चित्रपटाचा लाभ घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे नम्र आवाहन केले आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा मोठ्या पडद्यावर अनुभवण्याची ही एक अनोखी संधी आहे, तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा