खा. नारायण राणे यांच्या ७४ व्या वाढदिवसानिमित्त नाट्य महोत्सवाचे आयोजन
संदेश सावंत व समीर नलावडे तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्रमंडळाचे आयोजन
कणकवली
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, सिंधुदुर्ग – रत्नागिरी चे खा. नारायण राणे यांच्या ७४ व्या वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा परिषद चे माजी अध्यक्ष संदेश सावंत माजी नगराध्यक्ष समीर नलावडे व छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य दशावतारी नाटक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. हा नाट्य महोत्सव दिनांक ५ एप्रिल २०२५ पासून १० एप्रिल २०२५ पर्यंत होणार आहे. कणकवली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे तब्बल सहा दिवस नाट्य महोत्सव होणार आहे. महोत्सवाला नाट्य रसिकांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा असे, आवाहन जि.प.चे माजी अध्यक्ष संदेश सावंत व कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केले आहे.
५ एप्रिल ते १० एप्रिल दरम्यान पुढील नाटक सादर होणार
५ एप्रिल रोजी मोरेश्वर दशावतार नाट्य मंडळ, मोरे, ६ एप्रिल रोजी ओंकार दशावतार नाट्य मंडळ म्हापन, ७ एप्रिल रोजी देवेंद्र नाईक प्रस्तुत चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळ चेंदवन, ८ एप्रिल रोजी सुधीर कलिंगन प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ, नेरुर, ९ एप्रिल रोजी जय हनुमान पारंपारिक दशावतार नाट्य मंडळ, आरोस, १० एप्रिल रोजी अमृतनाथ दशावतार नाट्य मंडळ, पाट अशी दशावतार नाटक सादर केली जाणार आहेत.