मालवणात ५ एप्रिलला जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा…
मालवण
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त समाजकल्याण विभाग व बॅ. नाथ पै सेवांगण यांच्या संयुक्त विद्यमाने ५ एप्रिलला सकाळी १० वाजता मालवण बॅरिस्टर नाथ पै सेवांगणात जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेत गट पहिला सातवी ते बारावी तर दुसरा खुला गट आहे. पहिल्या गटासाठी भारतीय – “संविधानातील मूलभूत हक्क व अधिकार” तर दुसऱ्या गटासाठी “भारतीय संविधानाची ७५ वर्षे” असे विषय आहेत. पहिल्या गटासाठी ७ मिनिटे तर दुसऱ्या गटासाठी ८ मिनिटे वेळ आहे. विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम व प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या स्पर्धेत जास्तीत-जास्त स्पर्धकांनी सहभाग दर्शवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच अधिक माहितीसाठी लक्ष्मीकांत खोबरेकर ९४२२९४६२१२ यांच्याशी संपर्क साधावा.