अशी पण एक सामाजिक बांधिलकी मुस्लिम बांधवाने आजारी असलेल्या हिंदू मुलीला दिला मदतीचा हात.
सावंतवाडी
गेले तीन वर्षापासून आजारी असलेल्या दहावीतील एका शाळकरी मुलीला एका मुस्लिम क्रिकेट प्रशिक्षकाकडून औषधोपचाराकरिता मदतीचा हात पुढे केला आहे. आजपर्यंत जवळपास सदर त्या बांधवाने एका विश्वासाने पंधरा हजार रुपये इतकी मदत सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून हिंदू धर्मातील तसेच इतर धर्मातील निराधार,होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी तसेच लहान मुलांच्या आजारपणामध्ये मदत केली आहे आणि पुढेही करत राहणार परंतु आपले नाव कुठेही येऊ देऊ नका अशी त्यांनी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते रवी जाधव यांना विनंती केली तरीपण सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या मदतीची पोचपावती त्यांना वेळेत दिली जाते.
सावंतवाडी शहरांमध्ये हिंदू -मुस्लिम बंधूभाव चांगला आहे येथील शहरातील हिंदू- मुस्लिम बांधव पूर्वीपासून एकमेकांच्या वेळ प्रसंगाला धावत आलेले आहेत आणि हा सलोखा कायम चांगला राहण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.आज ईद आहे सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या वतीने सावंतवाडी शहरातील सर्व मुस्लिम बांधवांना इच्छा शुभेच्छा देण्यात आल्या.