गुढी पाडव्या निमीत्त अजित नाडकर्णी यांच्या कडुन मोफत दाखविण्यात आलेल्या छावा चित्रपटास उत्स्फूर्त प्रतिसाद
भविष्यात अश्या प्रकारचे लहान फोंडाघाट मध्ये थेटर होण्यासाठी करणार प्रयत्न – अजित नाडकर्णी
फोंडाघाट
*गुढी पाडव्या निमीत्त अजित नाडकर्णी यांच्या कडुन राधाकृष्ण मंगल कार्यालयात ।छावा ।चित्रपट विनामुल्य दाखवण्यात आला. शिवसेना उपनेते आणि आमचे मित्र श्री.संजयजी आग्रे यांनी ११ वाजता नारळ फोडुन अजित नाडकर्णी यांनी राबवलेल्या या गौष्टीचा अभिमान वाटतो असे सांगीतले. सर्व ठिकाणचे कार्यक्रम झालेवर चित्रपट सुरु झालेने हाॅल पुर्ण भरला होता. हे पाहुनअजित नाडकर्णी म्हणाले धर्मवीर संभाजी राजेंचा सार्थ अभिमान सर्व फोंडाघाट वासीयांना वाटतो. बीग स्क्रीनवर सिनेमा बघताना लोकांनी जय भवानी जय संभाजीा महाराज कि जयचा नारा लावुन हाॅल दणाणुन सोडले .११ ते२ वाजेपर्यंत सिनेमा चालु होता. मध्यंतरानंतर सिनेमा पाहुन सर्व भाराहुन गेले.हाॅल श्री.कराळे यांचेही अजित नाडकर्णी यांनी धन्यवाद दिले.भविष्यात अश्या प्रकारचे लहान फोंडाघाट मध्ये थेटर होण्यासाठी प्रयत्न मंत्री नितेशजी राणे यांचे मार्फत करणार असे श्री.अजित नाडकर्णी म्हणाले.
*अजित नाडकर्णी,शुभांजीत श्रृष्टी*