You are currently viewing श्री स्वामी समर्थ वंदन

श्री स्वामी समर्थ वंदन

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचाचे सन्माननीय सदस्य कवी गीतकार गायक संगीतकार श्री अरुण गांगल लिखित “पूजनीय श्री अक्कलकोट स्वामी प्रकट दिना निमित्त अप्रतिम काव्यरचना!”*

 

*||श्री स्वामी समर्थ वंदन||*

 

अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ संत

दत्तात्रयांचे तिसरे अवतार सर्व ज्ञातIIधृII

 

अंगी शोभे भस्म रुद्र माळ भाळी त्रिपुंड

उंच देह अजानुबाहु मुखी शिव नाम

तांबूल आवडे सांगती मी नृसिंहभानII1II

 

कर्दळी वनां तप केले तिनशे वर्षांहून

तप करीता मुंग्यांनी केले वारूळ अजाण

कुऱ्हाड निसटली लाकूडतोड्या कडूनII2II

 

वारुळावर पडता कुऱ्हाड रक्त आले आतून

उद्धवा समोर प्रकाश पडला वारुळांतून

स्वामी प्रगटले तेजवान सहृदयतेनंII3II

 

त्र्यंबके शंकर गजाननांना दीक्षा देऊन

साईंना श्री बिडकरांना केले अनुग्रहित

भिऊ नको पाठीशी आहे देत आशीर्वचनII4II

 

लोकोद्धारासाठी स्वामिंनी केले भारत भ्रमण

सर्वांचे दुःख हरती स्वामी लीला अगाध

अक्कलकोटी समाधीस्थ देत आशीर्वादII5II

 

श्री अरुण गांगल.कर्जत रायगड महाराष्ट्र.

पिन.410201.Cell.9373811677.

प्रतिक्रिया व्यक्त करा