*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी गीतकार गायक संगीतकार अरूण गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*
*”नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा”*
पाडव्याला गुढी उभारु दारी बांधू तोरण
संकल्पाची घेऊ आण राम करी ईच्छा पूर्ण!!धृ!!
सृष्टी निर्मिली ब्रह्मानं रक्षिली वसु राजानं
चैत्र मासी वसंतात धरा जाई बहरुन
विश्वबंधुत्व जपावे रक्षावे पर्यावरण!!1!!
तपस्या केली चेदिच्या राजा वसुनं
सृष्टी रक्षिण्या वसुला वर दिला इंद्रानं
देवाने दिल्या वेळूचे त्याने केले पूजन!!2!!
संकल्प पूर्ण करण्याचा आज शुभदिन
प्रभू आयोध्येस आले वनवास संपवून
नगरवासी बांधीती आनंदे गुढ्या तोरण!!3!!
श्री अरुण गांगल कर्जत रायगड महाराष्ट्र.
पिन.410201.Cell.9373811677.