*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ.स्मिता रेखडे लिखित अप्रतिम काव्यरचना*
*” अवनी खुलली “*
चैत्र शुध्द प्रतिपदा दिनी मंगल पुजन
नमुनी माथा उभारू पाडव्याची गुढी
संकल्प धरूया नववर्ष करु आनंदघन
राम जन्मोत्सव प्रारंभ जोपासुया रूढी ||१||
साडे तीन मुहूर्तात लाभला सण पाडवा
रेशमी शेला कडुलिंब गाठी ध्वज कळस
शुभ कार्य खरेदी प्रारंभ संवत्सरी गोडवा
विजय समृद्धी चैतन्य वारे फुलवी पळस ||२||
वसंतोत्सव आगमन बहरला मास चैत्र
पालवी कोवळी सजली अवनी खुलली
संपन्नता निसर्गी हर्षोल्हासीत सृजन मैत्र
तोरण मंगल दारी उत्सव परंपरा सजली ||३||
जय श्रीराम गुंजे रणक्षेत्रावर विजयाला
पराक्रम न्यायाचा सत्याचा जयजयकार
गंधर्वाचे सुर लाभे रामसीता मिलनाला
अयोध्या येता श्रीराम,आनंदी गुढी साकार ||४||
संस्कृती आपुली लक्ष्मीची पावले दारी
कलात्मक सौदंर्याने उबंरठा शोभे भारी
जीवजंतू नाश होई कडुलिंब,झेंडू दारी
नकाराची ऊर्जा संपे सण सजे घरोघरी ||५||
सौ. स्मिता श्रीकांत रेखडे.