*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे जनसंपर्क अधिकारी ज्येष्ठ लेखक कवी विलास कुलकर्णी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*गुढी पाडवा*
फुलला पांगारा पळस आंब्याला आला मोहर
मोहाची मादक फुले पसरवी रानावनात बहर
फुटली पिंपळाला पालवी फणसाला आले गर
रातराणी हून धुंद कडुनिंबाच्या फुलांचा केशर
नव वर्षी वसंतात आली नव चैतन्याची लहर
घेशील किती वेड्या अपुरे पडतील दोन्ही कर
शुभारंभ शक गणनेचा पाडव्याचा चमत्कार
स्नेहाच्या गोडव्यातून वाजे सनईचे मंगलसूर
चैत्राच्या सोनेरी दिवशी खरेदीला येई महापूर
ब्रम्हध्वज लावून दारी लावली प्रेमाची झालर
गुढी पताका तोरणानी सजले सर्वांचे घरदार
निघाली शोभायात्रा लेवुन पैठण्या नववार
मराठमोळा सण हा शपथ घ्या पुजुनी शंकर
मंगल दिन हा फेकून देऊ अमंगलाचे कंकर
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
विलास (आप्पा )कुलकर्णी
मीरा रोड
7506848664