आपली कला संस्कृती जपली पाहिजे आमदार निलेश राणे यांचे आवाहन
कुडाळ येथे महायुतीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिमगोत्सवात केले आवाहन
कुडाळ
आपली कला संस्कृती जपली पाहिजे या शिमगोत्सवात मधून ही कला आणि संस्कृती जपण्याचा आमचा प्रयत्न आहे असे आमदार निलेश राणे यांनी सांगून यापुढे दरवर्षी गुढीपाडव्यापूर्वी हा शिमगोत्सव कुडाळ येथे होणार असेही त्यांनी जाहीर केले. 
कुडाळ येथे महायुतीच्यावतीने शिमगोत्सव आयोजित करण्यात आला होता या उत्सवाचे उद्घाटन आमदार निलेश राणे यांच्या हस्ते झाले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उपनेते संजय आंग्रे, भाजपा तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे काका कुडाळकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते, माजी नगराध्यक्ष संजू परब, उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विकास कुडाळकर, कुडाळ नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, दादा साईल, बबन शिंदे, राजू राऊळ, दिपक पाटकर, रुपेश पावसकर, विनायक राणे, विश्वास गावकर, नगरसेविक विलास कुडाळकर, नगरसेविका नयना मांजरेकर, श्रुती वर्दम, चांदणी कांबळी, रुपेश कानडे, तालुकाप्रमुख अरविंद करलकर आदी उपस्थित होते.
यावेळी आमदार निलेश राणे यांनी सिंबोत्सवानिमित्त होणाऱ्या रोंबाट कार्यक्रमाचा आनंद घेतला त्यानंतर त्यांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितले की वीज, पाणी, रस्ते या पायाभूत सुविधा होत राहणार, पण त्या पलीकडे सुद्धा आपली कला, संस्कृती जपली पाहिजे. तसेच उद्योग, व्यवसाय, शिक्षण, आरोग्य या प्रश्नांकडे सुद्धा लक्ष देणे गरजेचे आहे. राजकीय जीवनात अनेक अशा महत्त्वाच्या आणि लोकांसाठी आवश्यक असणाऱ्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होतो पण तो होणार नाही याची खबरदारी मी घेत आहे. आपल्याला प्रत्येक घटकाला विकास प्रक्रियेत आणलं पाहिजे. यासाठी माझा प्रयत्न आहे. आणि त्या दृष्टिकोनातून मी काम करत आहे. आपल्या जिल्ह्याचे नाव महाराष्ट्रात घेतलं पाहिजे तसे प्रयत्न मी करत आहे असे सांगून आमच्यापासून दुरावलेले आणि मी लहान असताना ज्यांनी माझ्यावर राजकीय संस्कार केले ते सगळे आज एका व्यासपीठावर आहेत त्याचा आनंद मला आहे आमच्या सर्वांचे राजकीय गुरु हे राणे साहेब आहेत आणि त्यांचे सर्व शिष्य आता एकत्र आले आहेत. हे बघून बरं वाटत आहे. असे त्यांनी यावेळी सांगितले यावेळी त्यांनी सांगितले की, दरवर्षी हा शिमगोत्सव गुढीपाडव्याच्या पूर्वी साजरा केला जाणार असे सांगितले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवक्ते रत्नाकर जोशी यांनी केले.