*’रंग रूपक’ ठरले नाट्य रसिकांसाठी पर्वणी!*
*एमआयटी-एडीटी विद्यापीठातील तीन दिवसीय राष्ट्रीय परिसंवादाचा समारोप*
पुणे:
सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, एमआयटी-एडीटी विद्यापीठ, पुणे येथील नाट्य विभाग आणि दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूर , संस्कृती मंत्रालय, भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने राज कपूर नाट्यगृह, पुणे येथे झालेल्या ‘रंग रूपक’ या तीन दिवसीय राष्ट्रीय परिसंवादात भारतीय नाट्य शास्त्रावर अतिशय मौलिक मंथन पार पडले. ‘रंग रूपक’ हा परिसंवाद नाट्य रसिकांसाठी पर्वणीच ठरला.
भारतीय ज्ञान परंपरेतील नाट्य संस्कृतीचा प्रसार व्हावा या हेतूने “भारतीय ज्ञान परंपरेतील नाट्यशास्त्राची भूमिका” ही विषयवस्तू घेवून आयोजित या परिसवांदात राष्ट्रीय स्तरावरील नामांकित नाट्यदिग्दर्शक/नाट्यकर्मी यांनी तीन दिवस विद्यार्थी व सहभागींना मार्गदर्शन केले. या परिसंवादाचे उद्घाटन, राष्ट्रीय नाट्य विद्यालय, नवी दिल्लीचे माजी संचालक पद्मश्री प्रा. वामन केंद्रे, राष्ट्रीय नाट्य विद्यालय,नवी दिल्लीचे कार्यकारी अध्यक्ष पद्मश्री प्रा. भरत गुप्त, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डाॅ.राजेश एस., कुलसचिव डाॅ.महेश चोपडे, संस्कार भारतीचे अभिजित गोखले, सिनेनाट्य विभागाचे अधिष्ठाता डॉ. मुकेश शर्मा, आयोजक डॉ. अमोल देशमुख यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
उद्घाटन सोहळ्याची सुरुवात जर्जर ध्वज पूजन आणि संबळ वादनाने झाली. यानंतर रंगमंचावर नटराज पूजन होऊन अंगवस्त्र व संत ज्ञानेश्वर प्रतिमा देऊन पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकतेतून नाट्यशास्त्रातील भारतीयत्व आणि स्वत्व चा विचार या परिसंवादाची प्रेरणा असल्याचे वक्तव्य परिसंवाद संयोजक व नाट्य विभाग प्रमुख डाॅ.अमोल देशमुख यांनी केले. यानंतर आपल्या उद्घाटनपर भाषणातून भरतमुनी रचित नाट्यशास्त्र हा भारतीय संस्कृतीचा महत्त्वपूर्ण वारसा असून आजही नाट्यशास्त्र प्रासंगिक असल्याचे प्रा. वामन केंद्रे म्हणाले. यापुढे बोलतांना भारतीय ज्ञान परंपरेत नाट्यशास्त्राची भूमिका महत्वपूर्ण याकरिता आहे की, भारतीय संस्कृती, परंपरा, तत्वज्ञान, मानसशास्त्र याचा विचारही यात झालेला दिसून येतो. या शास्त्राला वगळून अभिनय प्रशिक्षणाचा विचार करता येत नसल्याने राष्ट्रीय नाट्य विद्यालय नवी दिल्ली येथील नाट्य प्रशिक्षणात नाट्यशास्त्र एक महत्वाचा भाग आहे,असे वक्तव्य त्यांनी केले.
पद्मश्री प्रा. भरत गुप्त यांनी आपल्या बीज भाषणातून नाट्यशास्त्राचा इतिहास आणि सध्याच्या काळात त्याचे महत्व अधोरेखित करताना नाट्यशास्त्राचे विशेष प्रशिक्षण देण्यासाठी राष्ट्रीय नाट्य विद्यालय ने वाराणशी केंद्र सुरू केल्याचे सांगितले. या परिसंवादाच्या आयोजनासाठी एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या नाट्य विभागाने घेतलेला पुढाकार कौतुकास्पद असून असा नाट्य विभाग स्थापन केल्या बद्दल विद्यापीठाचे तोंड भरून कौतुक केले. यानंतर कुलगुरू डॉ. राजेश एस, कुलसचिव डॉ.चोपडे,अधिष्ठाता डॉ.मुकेश शर्मा आणि अभिजित गोखले यांनी परिसंवादाला शुभेच्छा दिल्यात. याप्रसंगी कार्यक्रमाचे संचालन अभिनेत्री कल्याणी कुमारी यांनी तर आभार प्रदर्शन प्रशांत कुलकर्णी यांनी केले.
उद्घाटनानंतर, पद्मश्री वामन केंद्रे दिग्दर्शित ‘मध्यम व्यायोग’ चे हिंदी रूपांतर “मोहे पिया”या अंगावर शहारे आणणाऱ्या रोमांचक नाटकाचे सादरीकरण, उर्मिलाताई कराड सभागृहात करण्यात आले. ज्याला, ज्याला उपस्थितांची मोठी दाद मिळाली.
पहिल्या दिवसाप्रमाणेच परिसंवादाचा दुसरा दिवसही कला क्षेत्रातील विद्यार्थी, अभ्यासकांसाठी पर्वणी ठरला. ज्यात, ‘नाट्यशास्त्र अभिनय पक्ष’ या विषयावर प्रख्यात शास्त्रीय नर्तक पद्मश्री शशधर आचार्य, प्रो.सुज्ञान कुमार मोहंती, डॉ. गौतम चॅटर्जी यांनी मार्गदर्शन केले. ज्यात त्यांनी नाट्यशास्त्रातील अभिनयाचे विविध पैलू उपस्थितांसमोर उलगडले. दुपारच्या सत्रात, गुरु शमा भाटे, डाॅ.प्रसाद भिडे व प्रा.संध्या रायते यांनी ‘नाट्य शास्त्र- प्रयोग पक्ष’ या विषयावर उपस्थितांना बहुमोल मार्गदर्शन केले. त्यानंतर, गुरु शमा भाटे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘राम-लल्ला’ या भरतनाट्यमच्या नृत्य-नाटिकेचा प्रयोग करण्यात आला. ज्याने उपस्थितांना संमोहित केले.
या परिसंवादाच्या आयोजनासाठी एमआयटी-एडीटी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड, कुलगुरू डॉ. राजेश एस, कुलसचिव डॉ. महेश चोपडे, महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे, दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूरच्या संचालिका आस्था गोडबोले कार्लेकर, संस्कार भारतीचे अखिल भारतीय संघटन मंत्रीअभिजीत गोखले यांचे मार्गदर्शन मिळाले. परिसंवादाला निरीक्षक म्हणून डॉ. जयंत शेवतेकर, डॉ संयुक्ता थोरात, डॉ. अनुराधा पत्की, डॉ. योगिता महाजन, डॉ. संपदा कुलकर्णी, प्रा. रेणुका बोधनकर, अनंत पणशीकर, प्रवीण कुलकर्णी, कविता विभावरी, विशाल तराळ उदय शेवडे यांच्यासह संपूर्ण भारतातून अनेक विश्वविद्यालयाचे नाट्यविभागाचे विद्यार्थी, प्राध्यापक, संशोधक,कलावंत मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. परिसंवादाच्या यशस्वितेसाठी नाट्य विभाग प्रमुख डॉ. अमोल देशमुख, समन्वयक म्हणून प्रा. सुनीता नागपाल, प्रा. निखिल शेटे, प्रा. अनिर्बाण बनिक आणि प्रा. किरण पावसकर यांनी अथक परिश्रम घेतले.
*चौकट*
*’नाट्य उत्पत्ती’ व ‘देवशुनी’ नाटकांचे सादरीकरण*
या परिसंवादाच्या तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात ज्येष्ठ नाट्य तज्ज्ञ डॉ. संगीता गुंदेचा आणि पियाल भट्टाचार्य यांनी नाट्यशास्त्राच्या ‘सौदर्य’ पक्षावर मार्गदर्शन केले. यानंतर समारोपीय सत्राला संगीत नाटक अकादमी, नवी दिल्लीच्या अध्यक्षा डॉ. संध्या पुरेचा, पद्मश्री भरत गुप्त, अभिजित गोखले यांच्या उपस्थितीत पार पडला. याप्रसंगी निरीक्षकांचे प्रतिनिधी म्हणून डॉ. जयंत शेवतेकर, डॉ. संयुक्ता थोरात यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यानंतर दुपारी उर्मिलाताई कराड सभागृहात डाॅ.संगीता गुंदेचा दिग्दर्शित ‘नाट्य उत्पत्ती’ आणि डाॅ.प्रसाद भिडे दिग्दर्शित ‘देवशुनी’ या नाटकांचे प्रयोग पार पडले. ज्याला उपस्थितांची भरघोस दाद मिळाली.
————————-
*फोटोओळः फोटो.क्र.1-* ‘माध्यम व्यायोग’ या अंगावर शहारे आणणाऱ्या रोमांचक नाटकातील एक प्रसंग.
*फोटो.क्र.2 -* ‘माध्यम व्यायोग’ या रोमांचक नाटकातील एक भावनिक प्रसंग.
फोटो क्र.3- गुरु शमा भाटे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘राम-लल्ला’ या भरतनाट्यमच्या नृत्य-नाटिकेचा प्रयोग.
फोटो क्र.4- डाॅ.संगीता गुंदेचा दिग्दर्शित ‘नाट्य उत्पत्ती’ आणि डाॅ.प्रसाद भिडे दिग्दर्शित ‘देवशुनी’ या नाटकांचे प्रयोग.
फोटो क्र.5- परिसंवादाचे उद्घाटन करताना पद्मश्री प्रा. वामन केंद्रे, पद्मश्री प्रा. भरत गुप्त, कुलगुरू प्रा.डाॅ.राजेश एस., कुलसचिव डाॅ.महेश चोपडे, अभिजित गोखले, डॉ. मुकेश शर्मा, डॉ. अमोल देशमुख.