You are currently viewing बांदा नं.१केंद्रशाळेत विद्यार्थ्यांनी उभारली पुस्तकांची गुढी

बांदा नं.१केंद्रशाळेत विद्यार्थ्यांनी उभारली पुस्तकांची गुढी

*बांदा नं.१केंद्रशाळेत विद्यार्थ्यांनी उभारली पुस्तकांची गुढी*

*बांदा*

बांदा येथील जिल्हा परिषद पीएम श्री बांदा नं.१केंद्रशाळेत विद्यार्थी व शिक्षक यांनी पुस्तकांची गुढी उभारून मराठी नववर्षाचे स्वागत केले.
सध्याच्या मोबाईलच्या युगात वाचन संस्कृती ही नाहीशी होत आहे.विद्याथ्यांमध्ये वाचन संस्कृती रूजावी यासाठी पुस्तकांचे वाचन होणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी पुस्तकांशी घट्ट मैत्री करावी, ज्ञान समृद्ध व्हावे,ग्रंथ हेच गुरू आहेत असे विचार यातून विद्यार्थ्यांमध्ये रूजवले.
शाळेत उभारण्यात आलेल्या या पुस्तकगुढीचे पुजन शाळेतील सेवाज्येष्ठ शिक्षिका रसिका मालवणकर यांच्या हस्ते‌ करण्यात आले. यावेळी महावाचन उत्सव २०२४-२५मध्ये सावंतवाडी तालुक्यातून सुयश मिळवलेल्या विहान अरूण गवस यांचे पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.या पुस्तक गुढी उभारणी प्रसंगी बांदा सरपंच प्रियंका नाईक,माजी जिल्हा परिषद सदस्या श्वेता कोरगावकर, पंचायत समिती सावंतवाडी सहाय्यक गटविकास अधिकारी श्री जाधव,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रत्नाकर आगलावे, मुख्याध्यापक शांताराम असनकर व पालक आदि मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पदवीधर शिक्षक उदय सावळ, उपशिक्षक श्री जे.डी.पाटील, रंगनाथ परब, फ्रान्सिस फर्नांडिस,स्नेहा घाडी, शुभेच्छा सावंत, जागृती धुरी,मनिषा मोरे,कृपा कांबळे, सुप्रिया धामापूरकर‌ यांनी परिश्रम घेतले. बांदा केंद्रशाळेच्या वतीने उभारण्यात आलेल्या या पुस्तक गुढीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा