You are currently viewing सण पाडवा

सण पाडवा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री विजया केळकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*सण पाडवा*

 

नववरषाचा सण पाडवा

आज उभारावी दारी गुढी

आनंदाने करु कामकाज

सोडून मनामनातील अढी ….

 

कडुलिंब फुलला फुलला

नवपालवात शुभ्र नाजुक फुले

डेरेदार तरु गर्द हिरवा हिरवा

टपटप पाड पुष्पसडा बकुले ….

 

काठी वर साडी-खण-कलश

चढता गुढी गाठी हार कंठात

कळी-मोगरा,अबोलीचा गोफ

आरोग्याचे गुपित प्रसादात ….

 

नम्रता बाणवू , करुया नमन

ऐकत कुहू-कुहू कूजन

करु नामाचा गजर,षड्रिपु हनन

गणगौरी पूजन,सुखे संतुष्ट मन….

 

विजया केळकर______

नागपूर

प्रतिक्रिया व्यक्त करा