You are currently viewing सेतकरीना पोर मी…

सेतकरीना पोर मी…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अहिराणी बोलीतील अप्रतिम काव्यरचना*

 

*सेतकरीना पोर मी…*

 

शेतकरीना घरम्हां मी जलम देखा लिन्हा

चाच वखर म्हनत म्हनत मोठा मी व्हयनूना

काई माटी पाटी मनी वखरन्या रेघोट्या

हिरवं पिक फुली येस बोंडेसन्या पयाट्या…

 

कांदा लावस मिरची लावस बाजरी पयरंस

बांधे बांधे वारावर हिरवी जवारी डोलसं

कपाशीनं वावर मनं असं काही फुलसं

चंद्र चांदन्या बी फिक्या चांदीम्हा डोलस…

 

बटन दाबताच पानी मनं मेरे मेरे जासं

उभा ऱ्हाईन बारासम्हा बारा मी धरसं

थंडगार पानी मना पायले गुदगुल्या

ढेर व्हस माटी माय लोनीन्या बुधल्या…

 

हेरवर काठवर मस्त घरनी भाकर सोडसं

कांदा उपाडी मी लयसं भाकर गोड ती लागस

लोनचानी फोड संगे चाई चाई मी खासं

अमृतनी गोडी तोंडले पानी कितलं सुटसं…

 

कष्टकरी देह मना खुशाल तो ऱ्हास

शहरनी जिंदगानी माले पुचकट वाटसं

पोरीसले पडनी भूल महिनाना किराना

समदा दुनियाले पोसस मना वावरना दाना…

 

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा