*ज्येष्ठ साहित्यिक पत्रकार संपादक बाबू फिलिप्स डिसोजा कुमठेकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*गुढीपाडवा पर्वणी*
नव संवत्सर साजरा करू या चला
चैत्र आला चैतन्य घेऊनी स्वागताला
घरांवर उंच ब्रह्म ध्वज उभारू या
गुढी पाडवा मुहूर्त शुभ तोरणाला
-१-
रेशमी वस्त्रे,पुष्पहार ,साखर गाठी
कडुनिंबाची डहाळी, कळकाची काठी
रजत कलश मंडित उंच गुढी उभारू या
नव पर्वणी लाभाची चैत्र शुक्ल प्रतिपदेला
-२-
विजय ध्वज हा अयोध्या लोकराजा श्रीरामाचा
उल्हासित नगरजन न्यायदाता स्व राजाचा
सत्य युग अवतरले शांती समृद्धी जपाया
संपला वनवास कल्याणा राम अवतरला
-३-
संपले असूर राज संहारली राक्षसी कांक्षा
नष्ट मायाजाल जनांतरी रामराज्य प्रतिक्षा
सम दृष्टी प्रजे प्रति लोक हितकारी निर्णया
असो पाषाण क्षुद्र कितीही राम नामे तरला
-४-
-बाबू फिलीप डिसोजा कुमठेकर
अनिका पिकॅडिली ए-५०३
पुनावळे बाजार, पुनावळे, पुणे ४११०३३