You are currently viewing गुढीपाडवा

गुढीपाडवा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी चंद्रशेखर कासार लिखित अप्रतिम काव्यरचना*

*गुढीपाडवा*

आला दिन मांगल्याचा
नववर्ष शक संवत्सराचा
गुढी उभारू दारोदारी
प्रथम दिवस चैत्र मासाचा

गुढी उभारू मांगल्याची
नवचैतन्य चैत्रोत्सवाची
वस्त्रे आभूषणे तोरण
हार कंगन मुकूट कलशाची

पुजा विधीवत करू
करू आरती देवाची
प्रार्थना करू करू आराधना
सुख शांति समृद्धीची

पंचपक्वान्न नैवेद्य
सण मोठा साजरा करू
हर्षोल्हासाने एकमेकांना
नववर्ष शुभेच्छा देऊ

गुढी उभारता दारोदारी
नववर्षाचा आनंद झाला
चैत्र पालवी फुटता
निसर्ग सुशोभित झाला

निसर्ग सानिध्यात
चैत्र प्रफुल्लित करतो
वसंतात तनमनाला
सुखद गारवा देतो

चैतन्याचा गोडवा
गुढीपाडवा सणाला
दारोदारी गुढी बघून
मनास हर्षोत्सव झाला

कवी :-
*चंद्रशेखर प्रभाकर कासार*
*चांदवडकर , धुळे.*
8208667477.
7588318543.

प्रतिक्रिया व्यक्त करा