You are currently viewing कुडाळ ,पोलीस स्टेशन तीन रस्त्यावर शासकीय जागेत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक व्हावे..

कुडाळ ,पोलीस स्टेशन तीन रस्त्यावर शासकीय जागेत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक व्हावे..

कुडाळ ,पोलीस स्टेशन तीन रस्त्यावर शासकीय जागेत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक व्हावे..

तमाम शिवप्रेमी,हिंदुत्ववादी संघटनेची आमदार निलेश राणे यांच्या कडे मागणी…..

कुडाळ मालवण विधानसभेचे आमदार श्री. निलेशजी राणे यांनी आज बलिदान मास च्या शेवटच्या बलिदान दिनी राजमाता जिजाऊ चौकात उपस्थित राहून अभिवादन केले.
तसेच सकल हिंदू समाजा तर्फे कुडाळ शहरात पोलीस स्टेशन चौकात ,शासकीय जागेत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक व्हावे असे निवेदन सर्वानुमते आज देण्यात आले. हिंदु संघटनांनी या आधी या चौकाचे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक असे नामकरण केले आहे. गेले अनेक वर्षाची कुडाळ वासियांची अशी मागणी आहे.
या विषयावर बोलताना आमदार साहेबांनी आश्वासन दिले, शासकीय पातळीवर मी १००% प्रयत्न करेन ,अन्यथा स्वखर्चाने स्मारक उभे करेन. आपली मागणी पुर्ण करेन अशी ग्वाही समस्त जमलेल्या सकल हिंदू समाजाला दिली.यावेळेस
रमाकांत नाईक,विवेक पंडित, सुविनय दामले, बबन घुर्ये,काशिनाथ निकम, समीर सराफदार, राम सावंत, चंद्रशेखर पाटील, देवेश रेडकर, नचिकेत देसाई, धीरज पांचाळ,शुभम देसाई, प्रख्यात काणेकर, महेश गंगावणे, ओंकार मंडलोकर, उदय आईर, घनश्याम परब,मनोज वालावलकर, संतोष परब,प्राजक्ता शिलवलकर, संध्या तेरसे,मृणाल देसाई, अंजली वालावलकर , मावळा ग्रुप आणि इतर
उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा