You are currently viewing मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा स्पर्धेत तळवडे शाळा नंबर ९, सावंतवाडी तालुक्यात प्रथम

मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा स्पर्धेत तळवडे शाळा नंबर ९, सावंतवाडी तालुक्यात प्रथम

मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा स्पर्धेत तळवडे शाळा नंबर ९, सावंतवाडी तालुक्यात प्रथम

सावंतवाडी

”मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा” तालुकास्तरीय स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून , सावंतवाडी तालुका गटविकास अधिकारी श्री.व्ही.एम. नाईक यांच्या हस्ते तळवडे नंबर ९ शाळेला प्रमाणपत्र व गौरव चिन्ह देऊन गौरविण्यात आले.

सन २०२४/ २५ या शैक्षणिक वर्षातील मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा स्पर्धेत तळवडे नंबर नऊ शाळेने सहभाग घेतला होता. ही शाळा पहिली ते चौथीपर्यंतची असून या शाळेत दोन शिक्षक कार्यरत आहेत.शाळा व्यवस्थापन समिती,शिक्षक व पालक यांचा त्रिवेणी संगम झाल्यास शाळेचा विकास किती वेगाने होऊ शकतो याचे उदाहरण असलेली शाळा म्हणजेच तळवडे नंबर ९ शाळा.

या शाळेने पालकांच्या सहकार्याने गुणवत्ता व भौतिक विकास, शालेय गरजा पूर्ण करून सावंतवाडी तालुक्यामध्ये २०२४ /२५ या शैक्षणिक वर्षात मुख्यमंत्री माझी शाळा ,सुंदर शाळा अंतर्गत प्रथम क्रमांक प्राप्त केला होता. तसेच या शाळेने परसबाग स्पर्धेमध्येसुद्धा जिल्हास्तरावर प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले आहे.

“मुख्यमंत्री माझी शाळा ,सुंदर शाळा”या स्पर्धेचे बक्षीस वितरण नुकतेच पार पडले.या कार्यक्रमाला माननीय गटविकास अधिकारी श्री.व्ही.एम.नाईक साहेब,सावंतवाडी तालुका गटशिक्षणाधिकारी श्रीमती कल्पना बोडके मॅडम,बीट विस्तार अधिकारी श्री प्रमोद पावसकर सर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी गटविकास अधिकारी यांनी तळवडे नंबर ९ शाळेचे भरभरून कौतुक केले. शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. रामेश्वर मालवणकर, शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती अनुराधा सावंत व सहकारी शिक्षक श्री. दिगंबर तळणकर यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व तीन लाख रुपये अशा स्वरूपाचे बक्षीस माननीय गटविकास अधिकारी यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.

शाळेने मिळविलेल्या या यशाबद्दल सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

या यशामध्ये सहकार्य करणारे अध्यक्ष व सर्व व्यवस्थापन समिती , शिक्षक पालक संघ, माता पालक संघ,ग्रामस्थ तसेच मोलाचे व अचूक मार्गदर्शन करणारे तळवडे केंद्राचे माजी केंद्रप्रमुख व आत्ताचे आजगाव बीट विस्तार अधिकारी मान. श्री. प्रमोद पावसकर सर यांचे तसेच ,विद्यार्थी,पालक ,ग्रामस्थांचे शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम. अनुराधा सावंत यांनी आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा