You are currently viewing बेळगाव येथून सावंतवाडीत गो मांस घेऊन येणाऱ्याचा पाठलाग करीत पकडले

बेळगाव येथून सावंतवाडीत गो मांस घेऊन येणाऱ्याचा पाठलाग करीत पकडले

बेळगाव येथून सावंतवाडीत गो मांस घेऊन येणाऱ्याचा पाठलाग करीत पकडले*

सर्फराज खाजा ला दिले पोलिसांच्या ताब्यात..

सावंतवाडी

बेळगाव येथून खाजगी चार चाकी गाडीतून सावंतवाडीच्या दिशेने गोमांसाची वाहतूक करणाऱ्या गाडीचा थरारक पाठलाग करत ही वाहतूक हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी रोखली. बेळगाव वेंगुर्ले मार्गावर माडखोल येथे सकाळी ७.३० च्या सुमारास हा प्रकार घडला. स्विफ्ट गाडीतून हे गोमांस सावंतवाडीत आणले जात होते. गाडी चालक मोह. सर्फराज भाऊद्दीन ख्वाजा (वय ४५, राह. बाहेरचा वाडा, सावंतवाडी) याला गोरक्षकांनी थांबवत त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले.

बेळगाव येथून सावंतवाडीच्या दिशेने गोमांसाची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती हिंदू संघटनांना प्राप्त झाली होती. त्यानंतर आज पहाटे पासून बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, गोरक्षक सिंधुदुर्ग व हिंदू जागरण मंच या संघटनांचे कार्यकर्ते वेंगुर्ले बेळगाव रस्त्यावर थांबले होते. यावेळी एक संशयास्पद स्वीफ्ट गाडी माडखोल येथे येत असताना निदर्शनास आली. त्याला थांबविले असता सुरुवातीला त्याने उलट सुलट उत्तरे दिली मात्र त्यानंतर गाडीची तपासणी केली असता त्यात गोमांस आढळून आले.

यानंतर पोलिसांना पाचरण करून त्याला ताब्यात देण्यात आले. यावेळी पोलिसांसमोर गयावया करत हे गोमांस असून गेली कित्येक वर्षे आपण हा व्यवसाय करीत असल्याची कबुली त्याने दिली. तसेच या प्रकाराबाबत जाहीर माफी मागत यापुढे आपण असा व्यवसाय करणार नाही असेही त्याने सांगितले.

पोलीस उपविभागीय अधिकारी विनोद कांबळे व पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या घटनेनंतर सावंतवाडी तालुक्यात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला असून सणासुदीच्या पार्श्वभूमीवर कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी खबरदारीची पावले उचलली आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा