You are currently viewing गावगाडा

गावगाडा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*🪷🪷गावगाडा🪷🪷* 

 

गावात सर्व आहे जे जे जगात आहे

सौंदर्य जीवनाचे व्योमी ढगात आहे ।।१।।

 

मुंगीस साखरेचे देतात दान लोक

पाणी ही पाखरांना येथे टबात आहे।।२।।

 

गोग्रास काढताती दाणे ही अंडजांना

वैर्‍यास मारण्याची ऊर्जा म्यानात आहे ।।३।।

 

पीएम कलेक्टरादि सीएम हवालदार

सार्‍या पदविकांची नावे नगात आहे ।।४।।

 

सारे किसान गावी शेतात रामप्रहरी

रात्रीस मेळ त्यांचा दैवी संगात आहे ।।५।।

 

जातीवरुन होते चेष्टा खुशाल गावी

सोडून आढ्यता ती ओढा स्नेहात आहे ।।६।।

 

कोणी वाटसरु जे पत्ता विचारताती

हे सोडती घरात प्रीती वहात आहे ।।७।।

 

येथे जुगलबंदी होतेच टोमण्यांची

त्याची कधीच नाही बीजे वैरात आहे ।।८।।

 

गावात ज्ञान आहे श्रद्धा , विज्ञान आहे

जाणून एकमेका अब्रू नसात आहे ।।९।।

 

दिल्लीत होत जे जे गल्लीत सर्व होते

दिल्लीत द्वेष गावी नाते सुखात आहे ।।१०।।

 

हे संग्रहालयात ठेवा खुशाल गाव

सर्वामुखीच व्हावे आदर्श ज्ञात आहे ।।११।।

🪷🪷🙏🙏

*©सर्वस्पर्शी*

©कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख.

नाशिक ९८२३२१९५५०

प्रतिक्रिया व्यक्त करा