ॲड. परशुराम बाबुराव चव्हाण यांची नोटरी पदी
नियुक्ती
सावंतवाडी
सावंतवाडी तालुक्यातील कोलगाव येथील रहिवासी अॅङ परशुराम बाबुराव चव्हाण यांची भारत सरकारच्या नोटरी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. अॅङ परशुराम बाबुराव चव्हाण हे गेली अनेक वर्षे वकील म्हणून यशस्वीपणे सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यात देखील कार्यरत आहेत. त्यांनी सावंतवाडी तालुक्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील न्यायलयात फौजदारी तसेच दिवाणी स्वरुपात आपला वकिली व्यवसाय केला आहे. त्यांची नोटरी पदी नियुक्ती झाल्यावद्दल अॅङ परशुराम बाबुराव चव्हाण यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे, त्यांनी आपल्या नोटरी व्यवसायाची सुरुवात ते दिनांक १४ फेब्रुवारी २०२५ पासून गाळा क्र. अ/०५, तळमजला, गणेश प्लाझा, तहसिलदार कार्यालय रोड, सालईवाडा सावंतवाडी येथे केलेली आहे.