You are currently viewing प्रज्ञाशोध परीक्षा निकाल जाहीर

प्रज्ञाशोध परीक्षा निकाल जाहीर

प्रज्ञाशोध परीक्षा निकाल जाहीर

सिंधुदुर्गनगरी 

 जिल्हा परिषद मार्फत घेण्यात आलेल्या भारतरत्न डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम प्रज्ञाशोध परीक्षेचा सन 2024-25 चा अंतिम निकाल जाहीर झाला असल्याची माहिती शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॉ. गणपती कमळकर यांनी दिली.

इयत्ता सातवीमध्ये विराज संतोषकुमार कल्याणकर जिल्हा परिषद शाळा कणकवली नं-3, प्रथम तर वैदेही संदिप फोंडके विद्या मंदिर हेत, व्दितीय आणि ओम मुरलीधर भणगे, जिल्हा परिषद शाळा घोडगेवाडी तृतीय आलेला आहे. इयत्ता चौथीमधील पियुष विजय लाड, जिल्हा परिषद शाळा नेरुर शिरसोस प्रथम तर वृंदा विलास आवडण जिल्हा परिषद शाळा आरोंदा मानसी, व्दितीय, आणि देवेन विद्याधर पाटील जिल्हा परिषद शाळा फोंडा नं.1 तृतीय क्रमांक मिळवला आहे.

इयत्ता पाचवी व आठवीच्या शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेची पूर्वतयारी व्हावी, विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाचा व परीक्षांचा सराव व्हावा, स्पर्धात्मक अभ्यासाची सवय लागावी, विद्यार्थ्यांच्या ज्ञानात अधिक भर पडावी तसेच सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या वाढावी या हेतून सन 2018 पासून सिंधुदुर्ग जिल्हा  परीषदेच्या शाळेत शिकणाऱ्या  इयत्ता चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमार्फत भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम सिंधुदुर्ग प्रज्ञाशोध परीक्षेचे आयोजन करण्यात येते. यावर्षी या परीक्षा 9 मार्च  2025 रोजी जिल्ह्यातील एकुण 40 परीक्षा केंद्रावर संपन्न झाली.

यासाठी इयत्ता चौथीच्या परीक्षेसाठी एकूण 5165 विद्यार्थी व इयत्ता सातवीच्या परीक्षेसाठी एकुण 2224 विद्यार्थी मिळूण एकंदर एकूण 7389 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते.

इयत्ता चौथीमध्ये 1907 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून इयत्ता चौथीच्या निकाल 36.92 टक्के लागला आहे. तर इयत्ता सातवीमध्ये 460 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून इयत्ता सातवीचा निकाल 20.68 टक्के लागला आहे. सर्व विद्यार्थ्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक रविंद्र खेबुडकर यांनी अभिनंदन केले आहे.

इयत्ता चौथी तालुकानिहाय गुणानुक्रमे प्रथम 3 विद्यार्थी

अ.क्र विद्यार्थ्यांचे नाव इयत्ता शाळेचे नाव तालुका प्राप्त गुण  
पेपर-1 पेपर-2 एकूण गुणानुक्रम
1 दुर्वा मनीष कुबल 4 थी जि.प.शाळा शिरगाव नं.1 देवगड 124 140 264 प्रथम
2 स्वरुप आनंद लोके 4 थी  जि.प.शाळा मिठबाव देवगड 122 132 254 व्दितीय
3 शौर्य शेषराव चव्हाण 4 थी  जि.प.शाळा पडेल गावकरवाडी देवगड 122 126 248 तृतीय
4 तनय सतिश गवस 4 थी  जि.प.शाळा पिकुळे  नं.1 दोडामार्ग 116 132 248 प्रथम
5 अनुज रामचंद्र घाडी 4 थी जि.प.शाळा बोडदे दोडामार्ग 110 132 242 व्दितीय
6 आदित्य धावू झोरे 4 थी  जि.प.शाळा झरे काजूर  दोडामार्ग 108 130 238 तृतीय
7 देवेन विद्याधर पाटील 4 थी जि.प.शाळा फोंडा.1 कणकवली 134 142 276 प्रथम
8 चैतन्य मनोज गवाणकर 4 थी जि.प.शाळा  लोरे नं.1 कणकवली 132 140 272 व्दितीय
9  मंदार जीवदास जाधव 4थी जि.प.शाळा कासार्डे बौध्दवाडी कणकवली 108 146 254 तृतीय
10  पियुष विजय लाड  4 थी जि.प.शाळा नेरुर शिरसोस कुडाळ 140 144 284 प्रथम
11  अथर्व हरिश्चंद्र कालेलकर  4 थी जि.प.शाळा तुळसुली चव्हाटा कुडाळ 142 130 272 व्दितीय
12  वेदांत विजय साठे 4 थी जि.प.शाळा कुसबे कुडाळ 134 134 268 तृतीय
13 स्वरा परशुराम गुरव 4 थी जि.प.शाळा  असगणी नं.1 मालवण 132 140 272 प्रथम
14 शुभ्रा राजन नाईक 4 थी जि.प.शाळा पेंडूर न.1 मालवण 124 136 260 व्दितीय
15 चैतन्य कृष्णा गावडे 4 थी जि.प.शाळा वराड कुसरवे मालवण 122 134 256 तृतीय
16 वृंदा विलास आवडण 4 थी जि.प.शाळा आरोंदा मानसी सावंतवाडी 138 142 280 प्रथम
17 आराध्या अमोल आपटे 4 थी जि.प.शाळा सावंतवाडी नं.2 सावंतवाडी 128 142 270 व्दितीय
18 ओवी वसंत गरकल 4 थी जि.प.शाळा चराठे नं.2 सावंतवाडी 124 140 264 तृतीय
19 दुर्वा संदिप पोळेकर 4 थी विद्यामंदिर नाधवडे ब्राम्हणदेव नवलादेवी वैभववाडी 118 128 246 प्रथम
20 गोजीरी प्रशांत गोसावी 4 थी विद्यामंदिर लोरे मांजलकरवाडी वैभववाडी 112 132 244 व्दितीय
21 रोझन गुलजार काझी 4 थी विद्यामंदिर तिथवली  नं.1 वैभववाडी 114 128 242 तृतीय
22  रेयांश संदीप कोळसुलकर 4 थी जि.प.शाळा वेंगुर्ला नं.3 वेंगुर्ला 128 136 264 प्रथम
23 आर्यवी महादेव मुळीक 4 थी जि.प.शाळा वजराट नं.1 वेंगुर्ला 124 136 260

प्रतिक्रिया व्यक्त करा