मोफत कौशल्य विकास प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रमार्फत प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानांतर्गत मोफत कौशल्य विकास प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त इनुजा शेख यांनी केले आहे.
किमान कौशल्य विकास कार्यक्रम जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2024-25 साठी स्किल इंडिया पोर्टल व महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी मुंबई यांच्याकडे सुचिबध्द असलेल्या खालील संस्थांमार्फत सदरचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
प्रशिक्षण संस्थेचे नाव | सेक्टरचे नाव | अभ्यासक्रमाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
श्री. साई इन्फोटेक (एसएसआय कम्प्युटर सावंतवाडी ) | Ssc- Tourism And Hospitality | Guest Service Executive (Front office) | 12 वी पास |
SSC- Electronic & Hardware | Purchase Executive | 10 वी पास | |
SSC- Electronic & Hardware | Field Networking & Storage | 10 वी पास | |
तृषा इन्फोटेक मालवण, स.का.पाटील महाविद्यालय, मालवण | SSC- Electronic & Hardware | It coordinator in School | 10 वी पास |
SSC-Capital Goods | Draughtsman- Mechanical | 10 वी पास | |
व्यंकटेश स्किल ट्रेनिंग इंस्टिट्युट सुकळवाड, एमआयटीएम कॉलेज, सिंधुदुर्गनगरी रेल्वे स्टेशन जवळ सुकळवाड, मालवण | SSC- Electronic & Hardware | Field Technician-Other home Appliances | 10 वी पास |
SSC- Electronic & Hardware | Customer Care Executive | 10 वी पास | |
SSC- Electronic & Hardware | Field Technician computing & Peripherals | 12 वी पास | |
इनसाईट कम्प्युटर फोंडाघाट | SSC- Tourism And Hospitality | Food & Beverage Service Assistant | 10 वी पास |
( अटी व शर्ती :- वय 18 ते 45 वर्षे, यापूर्वी राज्य किंवा केंद्र शासनाच्या कौशल्य विकास योजनेंतर्गत कोणत्याही प्रशिक्षणाचा लाभ घेतलेला नसावा.)
वरील नमूद प्रशिक्षण संस्थांकडून त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या अभ्यासक्रमाचे मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी तात्काळ या प्रशिक्षण संस्थांकडे संपर्क करुन आपली नाव नोंदणी करावी किंवा जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्ग या कार्यालयाशी संपर्क करण्याचे, आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त इनुजा शेख यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे दूरध्वनी क्र. 02362 228835, ईमेल sindhudurgrojgr@Gmail.com वर संपर्क साधवा.
०००००