डॉ. के. एन. बोरफळकर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त ८ एप्रिल रोजी होणार भव्य सत्कार सोहळा – अँड अविनाश माणगावकर
देवगड
देवगड तालुकावासियांच्या ५० वर्षांपासून
वैद्यकीय सेवेत अविरत कार्यरत असलेले ज्येष्ठ डॉ. के. एन. बोरफळकर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त, त्यांच्या प्रदीर्घ कार्याप्रती व व्रतस्थ जीवनप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ८ एप्रिल रोजी सायंकाळी ५:३० वा शेठ म. ग. हायस्कूल पटांगण,
देवगड येथे अमृत सोहळा आयोजित केला आहे. अशी माहिती देवगड येथील अँड अविनाश माणगावकर यांनी दिली.
देवगड शेठ म. ग. हायस्कूल येथील गुरुदक्षिणा सभागृहात गुरुवारी सायंकाळी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी डॉ के एन बोरफळकर नागरी सत्कार समितीचे अध्यक्ष डॉ. प्रमोद आपटे, श्री.किशोर कुलकर्णी, दत्तात्रय जोशी, आदी उपस्थित होते.
अँड माणगावकर म्हणाले, या कार्यक्रमासाठी डॉ. अनंत गोरे, प्राध्यापक सायन हॉस्पिटल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार असून डॉ. अशोक भूपाळी, सरस्वती आयुर्वेद हॉस्पिटल यांच्या शुभहस्ते सत्कार केला जाणार आहे. तरी या नागरी सत्कारास उपस्थित राहावे,असे आवाहन डॉ के एन बोरफळकर नागरी सत्कार
समितीच्या वतीने करण्यात आले आहे.