You are currently viewing श्री गजानन विजय काव्यांजली काव्यपुष्प – ९१ वे

श्री गजानन विजय काव्यांजली काव्यपुष्प – ९१ वे

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी अरुण वि देशपांडे लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

।। गण गण गणात बोते ।। जय गजानन श्री गजानन ।।

___________________________

श्री गजानन विजय काव्यांजली काव्यपुष्प – ९१ वे

अध्याय- १६ वा , कविता – १ ली

___________________________

गजानन विजय ग्रंथाचे वाचन करावे। त्याचे चिंतन करावे । कल्याण साधावे । स्वतःचे ।। १ ।।

 

बघा या ग्रंथात । हर अध्यायात । श्री गजाननाचे दर्शन साक्षात । घडेल श्री दासगणूच्या शब्दातूनी ।।२ ।।

 

स्वामी गजानन । करिती कसे भक्त कल्याण । वाचावे असे अनेक क्षण । गजानन विजय ग्रंथात ।। ३ ।।

 

पुंडलिक मुंडगावीचा । भक्त एक श्री गजाननांचा । भाव होता त्याचा । श्री गजाननाप्रति ।। ४ ।।

 

पुंडलिकाच्या गावची भागाबाई । फार दांभिक ही बाई ।

भाविकांना बनवे ही बाई । भरवी बाजार दंभाचा ।।५।।

 

बोले भागाबाई पुंडलिकास । तू का जातो शेगावास ?।

मानू नको गुरू गजाननास । येत नसे काही त्यास ।। ६ ।।

 

भ्रष्ट आचरणी असे गजानन। देऊ नको त्यास गुरूचा मान।

कळे ना तुज, तू लहान । ऐक माझे पुंडलिका ।।७ ।।

 

गिन गिन गणाते “भजन । हे बोलतसे गजानन । कसले हे आचरण ? । बोले भागाबाई ।।८ ।।

 

त्याने मंत्र तुज ना दिला । विधी ना काही झाला । मग हा

तुझा गुरू कसा झाला ?। सांग तू पुंडलीका ।। ९ ।।

__________________________

करी क्रमशः हे लेखन कवी अरुणदास

__________________________

 

कवी अरुणदास – अरुण वि. देशपांडे – पुणे.

___________________________

प्रतिक्रिया व्यक्त करा