*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य तथा लालित्य नक्षत्रवेल समूह प्रशासक लेखक कवी दीपक पटेकर (दीपी) लिखित अप्रतिम काव्यरचना*
*कर्म हेचि ईश्वर*
(पादाकुलक वृत्त)
कर्म चांगले असता होते
खरेच आयुष्याचे सोने
देवाच्याही लागत नाही
पडुनी पाया सौख्य मागणे
देव जाणितो सत्य मनीचे
नवस कशाला नारळ पेढे
माथा टेका नि हात जोडा
नकोत घेऊ आढेवेढे
धाम कितीसे पायी फिरले
अंतरंग ना निर्मळ उरले
तीर्थ पिउनी तृष्णा शमली
व्यर्थ तरीही प्रयत्न ठरले
पाप धुवाया कुंभ नाहलो
शरीर धुतले पण मन मळके
आता ठरले कुठे न जावे
स्वच्छ करावे मनच जळके
कर्मामध्ये माणसांतही
ज्याच्या त्याच्या ठायी ईश्वर
माय पित्याची करुया सेवा
पुण्य कमवुया जीवन नश्वर..
🖋️ दीपक पटेकर (दीपी)
सावंतवाडी
८४४६७४३१९६