मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :
शिव उद्योग संघटनेच्या माध्यमातून विविध कलावंतांचा शिवसेनेत पक्षप्रवेश व नियुक्ती सोहळा बाळासाहेब भवन येथे मोठ्या उत्साहात पार पडला. कलावंतांना त्यांच्या कलेला हक्काचे व्यासपीठ मिळावे आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, या उद्देशाने शिव उद्योग संघटना महाराष्ट्रभर कार्य करत आहे.
सदर प्रसंगी शिव उद्योग संघटनेचे अध्यक्ष दीपक काळीद, सचिव प्रकाश ओहळे, इव्हेंट समिती प्रमुख गुरुदत्त वाकदेकर तसेच शिवसेना उद्योग व रोजगार विकास मंचचे अध्यक्ष शैलेश जायसवाल उपस्थित होते. श्री. पालांडे यांनी पक्षप्रवेश घडवून आणला.
कलावंत आणि पदाधिकाऱ्यांच्या योगदानाचा उचित सन्मान म्हणून विविध जबाबदाऱ्या देण्यात आल्या. या वेळी खालील व्यक्तींची नियुक्ती करण्यात आली:- रवींद्र कुडाळकर (मुंबई शहर संपर्कप्रमुख), विजय शिंदे (मुंबई शहर उपसंपर्कप्रमुख), संजय डुबल (इव्हेंट समिती उपप्रमुख), विजय कांबळे (इव्हेंट समिती सदस्य), गणेश सोनवणे (इव्हेंट समिती सदस्य), बबन चव्हाण (इव्हेंट समिती सदस्य), कोमल चव्हाण (महिला रोजगार समिती, विरार)
याप्रसंगी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेच्या संघटनात्मक बळकटीसाठी निष्ठेने कार्य करण्याची ग्वाही दिली. शिवसेनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी नव्या सदस्यांचे शिवसेनेचे वस्त्र घालून सर्वांचे स्वागत केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमात अनेक मान्यवर उपस्थित होते.
कलावंतांना विविध क्षेत्रांत प्रोत्साहन आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शिव उद्योग संघटना आणि शिवसेना उद्योग व रोजगार विकास मंच सातत्याने प्रयत्नशील आहे. या माध्यमातून कलाकारांना सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात पुढे जाण्याची संधी मिळणार आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिव उद्योग संघटनेचे कार्यकर्ते आणि इव्हेंट समितीने विशेष परिश्रम घेतले. नव्या नियुक्त्या पक्षाच्या विकासात मोलाची भूमिका बजावतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.