You are currently viewing तृतीयपंथीयाकडून युवतीला पळविण्याचा प्रयत्न…

तृतीयपंथीयाकडून युवतीला पळविण्याचा प्रयत्न…

तृतीयपंथीयाकडून युवतीला पळविण्याचा प्रयत्न…

सतर्क नागरिकांनी पाठलाग करून तृतीयपंथीला हुमरठ येथे पकडले ; युवतीची पोलिसांच्या मदतीने केली सुटका

कणकवली

नांदगाव येथील युवतीला तृतीयपंथी कडून पळवून नेण्याचा प्रयत्न झाला.मात्र सतर्क नागरिकांकडून पाठलाग करून तृतीयपंथीला हुमरठ येथे पकडून युवतीची पोलिसांच्या मदतीने सुटका केली.तर तृतीयपंथीच्या दुस-या साथीदाराला ग्रामस्थांनी नांदगाव येथे पकडून ठेवले.हि घटना गुरूवार दुपारी १२:४५ च्या सुमारास घडली.यावेळी युवतीवर जादूटोणा केल्याचे उपस्थितांमधून बोलले जात होते.
सदर तृतीय पंथी व्यक्तीने नांदगाव येथे फिरत असताना त्या युवतीला बोलण्यात गुंतवून आपल्या सोबत चालण्यास सांगितले.आपल्या मोहिणीच्या जाळ्यात युवती अडकली असल्याचे लक्षात येताच प्रवासी वाहनाने दोघही कणकवलीच्या दिशेने निघाले.त्याने नक्की काय जादूटोणा केला तो समजेना कारण युवतीही त्याला प्रतिसाद देऊ लागली.
मात्र याची माहिती स्थानिक ग्रामस्थांना कळताच ग्रामस्थांनी त्यातील एका तृतीयपंथीला पकडले तर दुसऱ्या तृतीय पंथीस त्या युवतीस नेताना मुंबई गोवा महामार्गावर हुमरठ येथे पकडण्यात यश आले. यानतंर तृतीय पंथीस कणकवली पोलीसाच्या ताब्यात देण्यात आले.तर युवतीला डॉक्टर उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.अधिक तपास कणकवली पोलीस करीत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा