गुढीपाडव्यापासून आपण ही भूमिका मांडणार केसरकर यांची पत्रकार परिषदेत माहिती
आंबोली :
शिवसेनेचे नेते तथा माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर पुन्हा एकदा शिवसेनेचे प्रमुख प्रवक्ते म्हणून पक्षाच्या माध्यमातून आपली भूमिका मांडणार आहे तशा सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना दिले आहेत. गुढीपाडव्यानंतर आपण ही भूमिका मांडू अशी माहिती आज आंबोली येथे आयोजित पत्रकार परिषदेत दीपक केसरकर यांनी दिली. यावेळी संजू परब, प्रेमानंद देसाई उपस्थित होते.
महाराष्ट्रात झालेल्या सत्तांतरानंतर श्री केसरकर यांनी शिवसेनेचे प्रवक्ते म्हणून ठळकपणे बाजू मांडली होती. त्यानंतर नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर केसरकर गेले काही दिवस शांत होते. मात्र सद्यस्थिती लक्षात घेता राज्यात पक्षासह नेत्याची बाजू मांडण्यासाठी पुन्हा एकदा दीपक केसरकर यांना प्रवक्ते म्हणून काम करायचे सूचना दिलेल्या आहेत याबाबतची माहिती श्री केसरकर यांनी दिली. ते म्हणाले पक्षाने अपक्ष प्रमुखांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे मी गुढीपाडव्याच्या नंतर पुन्हा एकदा पक्षप्रवक्ता म्हणून बाजू मांडणार आहे.