*जनतेकडून वैभव नाईक यांच्यावर प्रेमाचा,विश्वासाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव*
कणकवली
निष्ठावंत आणि लढवय्ये नेते माजी आमदार वैभव नाईक यांचा वाढदिवस विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी उत्साहात आणि उत्स्फूर्तपणे साजरा करण्यात आहे. बुधवारी २६ मार्च रोजी कणकवली येथील त्यांच्या निवासस्थानी शुभेच्छा देण्यासाठी जिल्हावासियांची सकाळपासूनच रीघ लागली होती. राजकीय नेते मंडळी, पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती, नाईक कुटूंबीय, तसेच मित्रपरिवार यांच्या उपस्थितीत सायंकाळी केक कापून वैभव नाईक यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.यावेळी हजारोंच्या संख्येने जिल्हावासीय नागरिक उपस्थित होते. वाढदिनी जनतेने वैभव नाईक यांच्यावर प्रेमाचा, विश्वासाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव केला.
*यावेळी परशुराम उपरकर म्हणाले,* वैभव नाईक यांचा पराभव झाला तेव्हा जिल्हावासीय आश्चर्यचकित होऊन भावुक झाले. वैभव नाईक निवडून आले पाहिजे होते अशी जिल्हावासियांची भावना होती.आर्थिक रसद आणि शेवटच्या एका तासात वाढलेले मतदान ज्याचा हिशेब सरकारला देता आला नाही. हेच वैभव नाईक यांच्या पराभवाचे कारण ठरले आहे. जे लोक शिवसेना फोडून गेलेत त्यांना समाजात किंमत मिळत नाही. लोकांच्या मनात त्यांच्याबद्दल द्वेष आहे. शिंदेनी स्थापन केलेली शिवसेना जास्त काळ टिकणार नाही. बाळासाहेबांनी स्थापन केलेली शिवसेनाच कायम राहणार आहे. २०२९ मध्ये आपण सर्वानी वैभव नाईक यांना पुन्हा आमदार बनवून जिल्ह्यातील इतर दोन्ही आमदार, आणि खासदार निवडून आणूया त्यादृष्टीने आपण आतापासून काम करूया. जनता पुन्हा वैभव नाईक यांच्यावरच विश्वास दाखवेल असा विश्वास परशुराम उपकर यांनी व्यक्त केला.
*संदेश पारकर म्हणाले,* वैभव नाईक यांनी गेल्या अनेक वर्षात लोकांचे प्रेम मिळविले आशीर्वाद मिळविला त्याची पोचपावती आजच्या वाढदिवस कार्यक्रमाला लाभलेल्या बहुसंख्येच्या उपस्थितीवरून दिसून येते.लढवय्या नेतृत्व म्हणून वैभव नाईक यांच्याकडे पाहिले जाते. जनतेच्या न्याय हक्क्कासाठी आंदोलने केली, अनेक विकासाची कामे मार्गी लावली. मात्र २०२४ च्या निवडणुकीत वैभव नाईक यांना हरप्रकारे विरोध झाला. वैभव नाईक त्याला सामोरे गेले.मात्र त्यांचा पराभव झाला. पण वैभव नाईक जिल्ह्याचे आणि कुडाळ मालवणचे नेतृत्व करताना त्यांच्या नेतृत्वाखाली लोकांना जे प्रेम आणि सन्मान मिळत होता तो आताच्या नेतृत्वात मिळत नाही.सामान्य लोकांवर अन्याय होत आहे. लोकांचे प्रश्न सुटत नाही. प्रत्येकाला राजकीय दबावाला बळी पडावे लागत आहे. हप्ते घेऊन अवैध धंदे चालवले जात आहेत. हि दुर्दैवाची बाब असल्याचे संदेश पारकर यांनी सांगितले.
*सतीश सावंत म्हणाले,* मोठ्या उत्साहात वैभव नाईक यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.शिवसेनेत फूट पडल्यानंतर अनेक ऑफर त्यांना देण्यात आल्या मात्र शेवटपर्यंत ते निष्ठावंत राहिले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर त्यांनी आवाज उठविला. प्रसंगी आंदोलन केले. शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून त्यांनी काम केले. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न आता विधानसभेत मांडतील असता कोणी कैवारी राहिला नाही. निवडणुकीत वैभव नाईक यांना अपयश आल्यानंतरही त्यांनी दुसऱ्या दिवशीपासून काम सुरु केले. आमदार असताना जस काम करत होते तसेच काम ते आजही करत आहेत. या अपयशातून भविष्यात ते पुन्हा उभारी घेतील असे सांगितले.
*वैभव नाईक म्हणाले,* मी १० वर्षे सर्वसामान्यांचा लोकप्रतिनिधी होतो. उद्योगपती, व्यावसायिक, गुटखा, मटका, दारू व्यवसायिकांचा लोकप्रतिनिधी मी कधीच नव्हतो. सर्वसामान्यांचे प्रश्न प्रामाणिकपणे सोडविण्याचा मी प्रयत्न केला. त्यामुळे ७३ हजार लोकांनी मला मतदान केले असून त्यांच्या अपेक्षा माझ्याकडूनच आहेत. जे आपल्या बरोबर राहतील त्यांच्यासाठी मी काम करत राहणार आहे. सत्ताधाऱ्यांना मोठे बहुमत मिळाले मात्र ते चुकीच्या पद्धतीने जिंकले आहेत. त्यामुळे माजी आमदारांना, पदाधिकाऱ्यांना प्रलोभने देऊन विरोधी पक्ष संपविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. येत्या काळात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका आहेत. माझ्या निवडणुकीत ज्याप्रमाणे मी मेहनत घेतली त्याच पद्धतीने कार्यकर्त्यांच्या निवडणुकांमध्ये मेहनत घेणार आहे. सर्व ताकदीनिशी मी तुमच्या पाठीशी राहणार असा विश्वास वैभव नाईक यांनी दिला.
*श्रेया परब म्हणाल्या,* वैभव नाईक यांच्याबरोबर काम करताना खूप काही शिकायला मिळाले. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत भला मोठा संघर्ष केला आहे.सर्वांना आदर्शवत काम त्यांनी केले.जिल्ह्याच्या जडघडणीत वैभव नाईक यांचा मोलाचा वाटा आहे असे सांगितले.
यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते अरुण दुधवडकर, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, उपनेत्या जान्हवी सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक,युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, महिला जिल्हाप्रमुख श्रेया परब, जिल्हाप्रमुख नीलम पालव, काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, नागेंद्र परब, कन्हैया पारकर, मंगेश लोके, हरी खोबरेकर, राजन नाईक, बबन बोभाटे, रुपेश राऊळ,जयभारत पालव,मुरलीधर नाईक,सतीश नाईक, सुषमा नाईक,स्नेहा नाईक, संकेत नाईक,नंदिनी नाईक,राजवर्धन नाईक, बंड्या नाईक,राजू कविटकर,प्रशांत पोकळे,स्वरूप कदम,संतोष गाडगीळ, सुदर्शन खोत,मंदार ओरसकर,सचिन कदम, कृष्णा धुरी,बाळा कोरगावकर,पराग नार्वेकर,अवधूत मालणकर,राजू जांभेकर,प्रा. मंदार सावंत,संदीप कदम,महेश देसाई,रुपेश नार्वेकर सुशील चिंदरकर, राजू राठोड, महेश कोदे, बाबा सावंत,रामा ताम्हणेकर,बाळू पालव, बंडू चव्हाण, गंगाराम सडवेलकर,संदेश प्रभू,नागेश ओरोसकर,पंकज वर्दम,रुपेश वर्दम,समीर लब्दे,भाऊ सावंत,अमित भोगले,राजेश गावकर,सन्मेष परब,किरण वाळके, स्वप्नील शिंदे,बाळा कांदळकर,पंढरी तावडे, सौरभ पारकर,तेजस राणे,मंगेश सावंत,गितेश कडू,धीरज मेस्त्री,गुरुनाथ पेडणेकर,नितेश भोगले,मंजू फडके,निशांत तेरसे आदींसह शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते व जिल्हावासीय हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.