You are currently viewing निधन वार्ता

निधन वार्ता

*निधन वार्ता*

पिंपरी

क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचलित खिंवसरा पाटील विद्यामंदिर, गणेशनगर थेरगाव येथील मुख्याध्यापक नटराज नारायण जगताप (वय ५३ वर्षे) यांचे गुरुवार, दिनांक २७ मार्च २०२५ रोजी सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. विश्व हिंदू परिषदेचे प्रांत सत्संग प्रमुख म्हणूनही ते कार्यरत होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, पुतणी, पुतण्या असा परिवार आहे. शांत, मनमिळाऊ, सुस्वभावी व्यक्तिमत्त्व असलेल्या नटराज जगताप यांचा क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती परिवारासह समाजात खूप मोठा जनसंपर्क होता. त्यांच्या अकस्मात निधनाने विद्यार्थी, माजी विद्यार्थी,पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारीवर्ग आणि
आणि समाजातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली.

खिंवसरा पाटील शिक्षण संकुल, गणेशनगर, थेरगाव येथे त्यांच्या अंतिम दर्शनासाठी खूप मोठी गर्दी झाली होती. नटराज जगताप यांचे अंत्यसंस्कार त्यांच्या मूळगावी कोळगाव डोळस, तालुका शिरूर, जिल्हा पुणे येथे करण्यात आले.

– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२

प्रतिक्रिया व्यक्त करा