श्री स्वामी समर्थ मठ कळसुली येथे ३१ रोजी स्वामी प्रकट दिन उत्सव
कणकवली –
प्रेमदया प्रतिष्ठान, मुंबई यांच्यावतीने स्थापन करण्यात आलेल्या श्री स्वामी समर्थ मठ कळसुली, हर्डी येथे सोमवार ३१ मार्च रोजी श्री स्वामी समर्थ प्रकट दिन उत्सव साजरा केला जाणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सोमवार ३१ मार्च रोजी पहाटे ४ ते ६ वा. काकड आरती, सकाळी ७:३० ते १०:३० वा. पुण्याहवाचन, अभिषेक, होमहवन, स्वामींची पादुका पूजन, ११ वा. श्री सत्यनारायण महापूजा, दु. १२ वा. महाआरती, दु१ ते २:३० वा. महाप्रसाद, ३ वा. श्री स्वामी समर्थ चरित्र सामुहिक पठण, ३:३० ते ५:३० वा. लहान मुलांचे सांस्कृतिक, नृत्य कार्यक्रम, सायंकाळी ६ वा. पालखी मिरवणूक, सायं. ७ वा. हरिपाठ, रात्री ८ वा. कीर्तन, ह.भ.प. बुवा पुरुषोत्तम पोखरणकर यांचे सुश्राव्य कीर्तन, रात्रौ ९ वा. स्थानिक सुस्वर भजने असे कार्यक्रम होणार आहेत. तरी सर्वांनी श्री स्वामी समर्थ प्रकट दिन उत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री स्वामी समर्थ मठ कळसुलीचे अध्यक्ष हनुमंत सावंत यांनी केले आहे.

