आमदार निलेश राणेंच्या प्रमुख उपस्थितीत उद्या मालवणात महिला मेळावा
मालवण :
जिल्हा परिषद सिंधुदुर्ग अंतर्गत मालवण पंचायत समिती, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी, महिला बाल कल्याण, उमेद कार्यालय मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी २८ मार्च सकाळी ११ वाजता समर्थ मंगल कार्यालय कोळंब येथे महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पंचायत समिती गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पंचायत समिती गटाविकास अधिकारी दालन येथे पत्रकार परिषद झाली. यावेळी पंचायत समिती अधीक्षक भीमसेन पळसंबकर, तालुका आरोग्य अधिकारी सुधीर धनगे, आरोग्य विस्तार अधिकारी सुरज बांगर, उमेद अभियान व्यवस्थापक रविकिरण कांबळी, उमेद प्रभाग समन्वयक प्रिया धरणे, विस्तार अधिकारी व्ही. के. जाधव, विस्तार पी. डी. जाधव यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. तालुक्यात सन २०२४-२०२५ या आर्थिक वर्षात विविध प्रकारच्या योजना राबविण्यात आल्या आहेत. त्या योजनांचे आमदार निलेश राणे याचे उपस्थितीत विविध लाभ दिलेल्या योजनांचे प्रतिकात्मक वितरण लाभार्थीना करण्यात येणार आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल योजना अंतर्गत घराची चावी देणे तसेच घर मंजुरीचे आदेश देणे. जिल्हा परिषद २० टक्के सेस अंतर्गत मागासवर्गीयांना जुने घर दुरस्ती अर्थसहाय्य, शिलाई मशीन, घरघंटी, ग्रासकटर खरेदी अर्थसहाय्य जिल्हा परिषद ५ टक्के अपंग सेस मधुन घरकुल बांधणे अर्थसहाय्य, घरघटी खरेदीसाठी अर्थसहाय्य व अस्थिव्यंग तीन चाकी गाडी खरेदीसाठी अर्थसहाय्य पंचायती समिती सेस अंतर्गत मागासवर्गीय जुने घर दुरुस्तीसाठी अर्थसहाय्य, ५ टक्के सेस अंतर्गत अपंगाना घर दुरुस्तीसाठी अर्थसहाय्य व १० टक्के सेस माहिला बाल कल्याण अंतर्गत महिलांना जुने घर दुरुस्ती साठी आर्थिक सहाय्य या योजनेंचे लाभार्थीना मंजुर लाभाचे आदेशाचे वितरण करणे असे विविध कार्यक्रमांचे आयोजन महिल्या मेळाव्यात करण्यात आले आहे. महिलांना कायदेविषयक, उदयोजगता व आरोग्य विषयावर तज्ञाकडुन मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तरी तालुक्यातील महिलानी या महिला मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.